कला-साहित्य

‘डिजिटल युगात कोंकणी साहित्य’ वर परिसंवाद

पणजी :
बदलत्या काळानुसार साहित्यामध्ये आणि त्याच्या सादरीकरणामध्ये बदल होत जातो. हा बदल प्रत्येक भाषेतील साहित्य कसे स्वीकारते आणि त्यानुरूप त्या भाषेतील साहित्यात काय बदल होतात का? आणि हे बदल त्या साहित्याचे वाचक कसे स्वीकारतात या आणि अशा विविध प्रश्नांचा उहापोह कोंकणी साहित्याच्या अनुषंगाने करण्यात येणार असून, केंद्रीय साहित्य अकादेमीच्या वतीने यासाठी १७ मे रोजी विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारताचे सांस्कृतिक खाते आणि साहित्य अकादेमीच्या संयुक्त विद्यमाने १७ मे रोजी दुपारी २ वाजता युट्युबवर सदर परिसंवादाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे उदघाटन साहित्यिक आणि पत्रकार ऑस्टिन प्रभू करणार आहेत. तर साहित्य अकॅडेमीचे मुंबई प्रभारी अधिकारी स्वागत करतील. कार्यक्रमाचे बीजभाषण शिक्षिका आणि संघटिका फ्लोरा कास्तीलिनो करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोंकणी भाषेचे निमंत्रक डॉ. भूषण भावे असणार आहेत. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी गोवा नाट्य विद्यालयाचे प्राचार्य रामराव वाघ असणार आहेत. तर युगांक नायक, सुशांत नायक, मेल्वीन पिंटो यावेळी ‘डिजिटल युगात कोंकणी साहित्य’ या विषयावर आपली अभ्यासपूर्ण मते मांडणार आहेत.

सदर कार्यक्रम सर्व साहित्यप्रेमी, भाषाप्रेमींसाठी खुला असून इथे क्लिक  करून यात सहभागी होता येईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: