गोवा 

”आयव्हरमेक्टिन’च्या कमिशन वाटणीत गोमंतकियांचा बळी’

गिरीश चोडणकर यांचा मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांवर सनसनाटी आरोप

पणजी :
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यामध्ये रुपये २२ कोटी ५० लाख रुपयांच्या आयव्हरमेक्टिन (ivermectin) गोळ्या खरेदीतील कमिशन वाटणीत झालेल्या वादानेच गोवा वैद्यकिय महाविद्यालय इस्पितळातील कोविड रुग्णांचा बळी घेतला असा सनसनाटी आरोप गोवा कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. या भयानक प्रकाराने सिएम ची व्याख्या “चिफ मर्डरर” तस एचएम ची व्याख्या “हॅचेट मॅन” अशी झाली आहे असा टोला गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांवर लगावला आहे.

गोव्यातीस १८ वर्षे वयावरील सर्वांना कोविडची बाधा होऊ नये यासाठी प्रोफिलेक्सीस उपचार म्हणुन आयव्हरमेक्टिन (ivermectin) गोळ्या देण्याचे सरकारने परवा जाहिर केले होते.मुख्यमंत्र्यांच्या संगनमतानेच सदर गोळ्यांची ऑर्डर आरोग्यखात्याने जारी केली होती. परंतु सदर ऑर्डरवरील रकमेची ६० टक्के कमिशनची रक्कम वाटुन घेण्यावरुन मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यात वाद सुरू झाला व त्याची परिणती दोघानीही एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला व निष्पाप रुग्णांचे प्राण गेले असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना धडा शिकवण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा आपल्या हाताखाली घेतला. त्यामुळे संतापलेल्या आरोग्यमंत्र्यानी ऑक्सिजन पुरवठाधारकांना धमकावण्यास सुरूवात केली. या वादाचा गंभीर परिणाम रुग्णांच्या प्राणावर बेतला असे गिरीश चोडणकर म्हणाले.

सदर आयव्हरमेक्टिन (ivermectin) गोळ्यांचे १२ मिलीग्रामच्या दहा गोळ्या असलेली स्ट्रिप बाजारात सरासरी रु. ३७० ला मिळते. या दराने गणित केल्यास एका गोळीची किंमत साधारण रु.३० होते. गोव्याची लोकसंख्या १५ लाख जमेस धरल्यास प्रती व्यक्ती पाच गोळ्या या प्रमाणे ७५ लाख गोळ्यांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे एकंदर ऑर्डर ही साधारण रु. २२ कोटी ५० लाख रुपयांची  आहे असे गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले.

गोमेकॉतील निष्पाप कोविड रुग्णांची हत्त्या गोव्यातील भाजप सरकारने ऑक्सिजन पुरवठा बंद करुन केल्याचे आता उघड झाले आहे. घटनेच्या कलम २१ चा हा भंग असून, भाजप सरकारने घटनेचाच गळा दाबला आहे. सरकारला या क्रुर कृत्याबद्दल न्यायपालीकेला जाब द्याव्याच लागेल, असेही चोडणकर यांनी म्हटले आहे.

ivermectinजागतिक आरोग्य संघटनेने सदर आयव्हरमेक्टिन गोळ्यांच्या सेवनासाठी रुग्णांची योग्य चिकीत्सा करुन घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत हे मी कालच सरकारच्या निदर्शनास आणले होते व सदर उपचार पद्धती राबविण्यासाठी वैज्ञानिक आधार आहे का हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी केली होती. परंतु, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी अजुनही त्यावर शब्द काढलेला नाही. यावरुनच सदर गोळ्यांच्या खरेदीत घोटाळा असल्याचे उघड होत आहे. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री या दोघांचीही हत्यारे म्हणुन गोव्याच्या इतिहासात नोंद होणार असुन, त्यांना एक सेकंद ही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, अशा तीव्र शब्दात चोडणकर यांनी सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे नैतिक जबाबदारी घेवुन राजीनामा देतील याची आम्हाला मुळीच अपेक्षा नाही. दिल्लीतील त्यांचे नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी हाताला रक्त लावुनच सत्ता काबीज केली हे संपुर्ण जगाला माहित आहे. भाजपचे तेच धोरण आहे. सन १९४७ साली महात्मा गांधीजींच्या हत्त्येने सुरू झालेला हा काळप्रवास आता भारतीयांनाच गुदमरून मारण्याकडे पोचला आहे. लोकांचा घटनात्मक “जगण्याचा हक्क” सरकार हिरावून घेत आहे
गोमंतकीयांनी भाजपची ही क्रुरकर्मे उघड्यी डोळ्यानी बघावीत व आठवणीत ठेवावीत. विरोधी पक्ष म्हणुन आम्ही जरी आवाज उठवित असलो तरी लोकशक्तीच या खुनी सरकारचा पराभव करु शकते असे गिरीश चोडणकर म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: