गोवा 

माजी सभापती शेख हसन हरूण यांचे निधन

पणजी :
गोव्याचे माजी सभापती शेख हसन हरूण यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते. ते 84 वर्षांचे होते. गोव्याच्या विधानसभेत पोहोचलेले मुस्लीम समाजाचे एकमेव नेते म्हणून हरूण ओळखले जातात. कारण त्यांच्या आधी किंवा त्यांच्या नंतर आतापर्यंत मुस्लीम समाजातून एकही आमदार झाला नाही.
प्रथितयश संपादित वकील असलेल्या हरुण यांनी काँग्रेसच्या तिकिटावर १९७७ साली मुरगावमधून निवडणूक लढवली आणि आमदार झाले. त्यानंतर ते सातत्याने पाचवेळा आमदार झाले. १९८० ते ८४ काळात ते कायदा व महसूलमंत्री होते. तर १९८५-८९ काळात कॅबिनेट मंत्री होते. १९९१-९५ या काळात ते विधानसभेचे सभापती होते. त्यानंतर १९९९-२००२ दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम सांभाळले होते.
काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या हरूण यांनी विधानभेत स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली होती. नंतरच्या काळात काँग्रेस नेत्यांशी मतभेद झाल्यानं त्यांनी शेख हसन इंडियन नॅशनल काँग्रेस हा पक्ष काढला. कालांतराने त्यांनी भारतीय जनता पार्टीत हा पक्ष विलिन केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: