गोवा कला-साहित्य

…असे साकारले उत्तम कोटकरांचे ‘शंभूराजे’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :

येथील श्री भगवती हायस्कूलचे सर्वेसर्वो उत्तम कोटकर यांचे आज आकस्मिक निधन झाले. आणि तालुक्यासह राज्यभरातील शिवप्रेमींना त्यांनी सादर केलेल्या ‘शंभूराजे’ या महानाट्याचे आठवण झाली. हायस्कुलमधील ५२० विद्यार्थ्यांसह साकारलेल्या या महानाट्यावर राज्यभरात पसंदीची मोहोर उमटवली होती.

हायस्कुलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमिताने निलांगी परब उर्फ शिंदे यांनी लिहिलेल्या शंभूराजे नाटकाचे महानाट्यात रुपांतर करणारे गोमंतकाचे आघाडीचे दिग्दर्शक जयेन्द्रनाथ हळदणकर महानाट्याचे आयोजन करून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले आणि या नाटकाद्वारे नवा इतिहास रचला गेला.

हायस्कूल मधील ५२० विद्यार्थ्याना घेवून ‘शंभूराजे’ या महानाट्याची निर्मिती उत्तम कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती.  त्या महानाट्याचे राज्यात ठिकठीकाणी प्रयोग झाले होते. पेडणे तालुक्यात आणि गोव्यात प्रथमच मोकळ्या रंगमंचावर ५२० कलाकारांना घेवून पेडणे भगवती हायस्कूलच्या विध्यार्थ्यांनी जे शंभूराजे महानाट्य सादर करून एक नवा इतिहास घडवला त्या सर्व कलाकारांचे आणि सर्व रंगमंचावरील व बाहेरील कलाकारांचे कौतुक व अभिनंदन झाले. कला संकृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी त्याना यासाठी सहकार्य केले होते .

उत्तम कोटकर

हायस्कुलचे सर्वेसर्वो उत्तम कोटकर यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे प्रत्येक कलाकारांनी आपले १०० टक्के योगदान देवून हा प्रयोग यशस्वी केला , या महानाट्यात शिवाजी यांचा डबिंग आवाज खुद्द कला मंत्री गोविंद गावडे यांचा आहे ते या प्रथम प्रयोगाला उपस्थित होते , त्याना प्रयोग मनापासून  भावाला त्यांनी लगेच आयोजकांना कला अकादमी येथे बोलावून या नाटकाचे इतरत्र प्रयोग करवावेत त्यासाठी कला संस्कृती खात्याचे सहकार्य मिळवून देणार असल्याचे सांगून आयोजकांचे अभिनंदन आणि कौतुक केले.

भगवती हायस्कूल पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार विनोद मेथर यांची निवड झाल्यानंतर आणि योगायोगाने यंदाचे वर्ष हे शिक्षण मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने पालक शिक्षक संघाने आणि अध्यक्ष विनोद मेथर यांनी आपल्या व्यवसायावर तीन महिन्यापेक्षा जास्त दुर्लक्ष करीत ‘शम्भूराजे’ महानाट्य यशस्वी करण्यासाठी तन मन धन अर्पून काम केले दिवस आणि रात्रीला दिवस मानून शून्यातून निर्माण करून पेडण्यातच नव्हे तर संपूर्ण गोव्यात महानाट्याद्वारे एक इतिहास रचण्यास पालक संघटना यशस्वी झाले . होते आणि आता चेरमेन कोतकर यांचे निधन झाल्यामुळे  पालक शिक्षण संघाने दुख व्यक्त केले.
 
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: