सातारा 

‘आपत्कालीन कामात शेखर गोरे यांचे नेहमीच सहकार्य’

सातारा (महेश पवार) :
शेखर गोरेंकडून मतदारसंघातील बाधितांच्या सेवेसाठी दोन रूग्णवाहिकेचे लोकार्पण शासकीय कामांसाठी करण्यात आले असून, या ऑक्सिजन व सर्वसुविधायुक्त रूग्णवाहिकांमुळे कोरोना बाधितांना दिलासा मिळाला आहे.  शेखर गोरे शासनाच्या आपत्कालीन कामासाठी आवश्यक मदत नेहमीच करत असल्याचे मत माणच्या तहसीलदार बी एस माने यांनी व्यक्त केले.

शेखरभाऊ प्रतिष्ठान ची एक रुग्णवाहिका गेली अनेक वर्षे अखंड पणे २४ तास विना मोबदला कार्यरत असताना आता दुसरी एक नवीन रुग्ण वाहिका या प्रतिष्ठान ने जनतेच्या सेवेत दाखल केली आहे. या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार माने बोलत होत्या.या वेळी सुरेखाताई पखाले ,माजी सभापती सौ.कविता जगदाळे ,गटविकास अधिकारी एस.बी.पाटील, सपोनि आर.पी.भुजबळ ,सहाय्यक गटविकास अधिकारी भरत चौगुले ,पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर ,आरोग्य अधिकारी कोडलकर , डॉ विजय लोखंडे ,डॉ.ओंबासे , नगरसेवक प्रशांत शिंदे , पंढरीनाथ जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनाच्या या जीवघेण्या लढाईत शेखरभाऊ गोरे जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांनी दहिवडी, महिमानगड कोविड सेंटर मोठी मदत केली आहे.या कोरोना च्या लाटेत ते स्वत: अडकले आहेत.ते कोरोना पॉझीटिव्ह आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.तरीही आपल्या मतदारसंघातील रूग्णांना वेळेवर उपचार व्हावेत.त्यांना बेड ,ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत यंत्रणा पोहचवत आहेत.व लागेल तिथे सेंटरसाठी मदत करत आहेत. याबद्दल शेखरभाऊ यांचे सर्वत्र आभार व्यक्त केले जात आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: