सिनेनामा

शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब करोना पॉझिटिव्ह

मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (shilpa shetty) संपूर्ण कुटुंबाला करोनाने घेरले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आहे.
शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे. “मागील १० दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझ्या सासु-सासऱ्यांची करोनो चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर समिषा, विहान, माझी आई आणि आता राज यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे सगळे त्याच्यां त्यांच्या रुममध्ये आयसोलेशनमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहेत. आमच्या घरातील दोन कर्मचारी देखील करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे आणि वैद्यकीय सुविधेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत,” असे शिल्पा म्हणाली.“देवाच्या कृपेने सर्व जण बरे होत आहेत. माझी करोना चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. नियमांनुसार सर्व खबरदारी घेतली जात आहे. बीएमसी आणि अधिकाऱ्यांचे त्यांनी केलेल्या मदतीचे आम्ही आभारी आहोत. आमच्यासाठी प्रार्थना करण्याचे देखील आभार. तुम्ही करोना पॉझिटिव्ह असो वा नसो, कृपया मास्क घाला, स्वच्छता ठेवा आणि सुरक्षित रहा..तरी सुद्धा मानसिकदृष्ट्या पॉझिटिव्ह रहा,” अशा आशयाची पोस्ट शिल्पाने (shilpa shetty) केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: