सातारा 

‘शिवेंद्रराजे, … तोपर्यंत तुम्ही काय केले?’ 

शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांचा आमदारांना प्रश्न 

सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यात जर मुंबई पुण्याहून किंवा बाहेर गावाहून आलेल्या चाकरमानीसाठी विलिनीकरण कक्ष उभारले असते तर आज जी कोरोनाची स्थिती साताऱ्यात आहे ती आलीच नसती. वेळेवर कोणतीच कार्यवाही करायची नाही आणि उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना इथे परिस्थिती सांभाळण्यासाठी बोलावयाचे. असेच असले तर मग आमदार शिवेंद्रराजे तुम्ही आजवर तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी केले काय? असा थेट प्रश्न शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी विचारला आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आव्हानानुसार सातारा तालुक्यातील 100गांवामध्ये औषध फवारणी व निर्जंतुकीकरण मोहीमेला कारी येथून नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी सचिन मोहिते यांनी शिवेंद्रराजेंच्या आजच्या विधानावर ‘राष्ट्रमत’कडे ही प्रतिक्रिया नोंदवली.
satara shivsena
सचिन मोहिते

खरं जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली यांचे कारण, पेशंट सापडल्यानंतर होम आयसोलेशन आहे. कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतानाही लोकांनी होम आयसोलेशन केल्याने रूग्ण वाढ झाली. जर मुंबई पुण्याहून किंवा बाहेर गावाहून आलेल्या चाकरमानीसाठी विलिनीकरण कक्ष उभारले असते तर ही वेळ आली नसती. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक वर्गणीतून अथवा स्वखर्चाने विलिनीकरण कक्ष उभारणे गरजेचे होते. ग्रामपंचायत सदस्य ते लोकसभेच्या सदस्य यांनी एकत्र येऊन विलिनीकरण कक्ष तयार करणं गरजेचं होते. आणि कोरोनाला आवरता आले असते, ठराविक लोकांनी पुढाकार घेतला आणि केले परंतु यात यांनी स्वखर्चाने सोडा लोकवर्गणीतून सुध्दा काही केले नाही आणि आता म्हणतायत अजित पवार आणि टोपे यांनी साताऱ्यात यावे. परिस्थिती हाताबाहेर गेली असे आवाहन करायला लागेपर्यंत तुम्ही काय करत होता? असा सवाल शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: