महाराष्ट्र

‘भाजपशी जुळवून घ्या, तेच फायद्याचे आहे’

मुंबई  :

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून पुन्हा भाजपसोबत युती केली तर पालिकेच्या निवडणुकांमध्ये पक्षाला फायदा होईल असे सांगितले आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचेच आमदार फोडत आहेत. त्यामुळे पक्ष कमकुवत होत आहे. त्यापेक्षा जर मोदींशी जुळवून घेऊन पुन्हा भाजपशी युती केली तर शिवसेनेला याचा फयदाच होईल. युती तुटली तरी भाजपच्या नेत्यांशी आपले वैयक्तिक संबंध चांगले आहेत. दोन्ही पक्षात अजूनही जिव्हाळा आहे, तो तूटण्याआधी परत जुळवून घेतले तर चांगले होईल.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या काळात केलेले काम वाखाणण्या जोगेच आहे. तसेच त्यांनी दिल्लीत जाऊन प्रधानमंत्र्यांची देखील भेट घेतली. राजकारणाला बाजूला ठेऊन आपण मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील लोकांना आपल्यामुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे. काँग्रेसने एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. तर राष्ट्रवादी शिवसेनेचेच नेते फोडत आहे. गेल्या दीड वर्षात मी अनेक आमदारांशी चर्चा केली त्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात. पण आपला मुख्यमंत्री असून शिवसेना आमदाराची कामे होत नाहीत. त्यामुळे अमदारांमध्ये नाराजी आहे. एका विशिष्ट परिस्थितीत महाविकास आघाडी तयार झाली पण शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केलेली नाही. असे प्रताप सरनाईकांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.

दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेलं पत्र समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. या सर्व चर्चांवर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले,”एखाद्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं असेल, तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहे? ते पत्रं खरं असेल तर त्यात एक मुद्दा आहे. तो तुमच्या माध्यमातूनच मला कळला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असं त्या पत्रात म्हटलं आहे. हा गंभीर आरोप आहे. आता विनाकारण त्रास कोण कुणाला देतंय? तो विनाकारण त्रास काय आहे? याचा शोध घेणं गरजेचं आहे,” असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपासह केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: