महाराष्ट्र

”त्या’ मावळ्यांना मिळणार एक किलो चांदीचे कडे…’

पुणे:

छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात विविध वादग्रस्त विधाने आज दिवसभरात होत आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. तत्पूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीचा इतिहास माध्यमासमोर मांडला.

यासगळ्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, महविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी उक्त तिघांचाही जाहीर निषेध केला आहे. अशावेळी पुणेस्थित ‘मराठा परिवारा’च्यावतीने राज्यपाल, त्रिवेदी, पडळकर यांना धडा शिकवणाऱ्या मावळ्याला तब्बल एक किलो चांदीचे कडे भेट देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

मराठा परिवाराच्या प्रसिध्दी पत्रकानुसार,

आजकाल शिवाजी महाराजांच्या इमेजला ठरवून टोचे मारायचे काम चालू आहे.
यापुढे महाराजांविषयी कोणाचीही चुकून किंवा मुद्दामून केलेली फालतू बडबड खपवून घेतली जाणार नाही.

आजच कोशारी, पडळकर आणि सुधांशू त्रिवेदी यांनी जे शेण खाल्ले त्यासाठी त्यांचा सत्कार तर झालाच पाहिजे, म्हणजे इथून पुढे कोणीही अशी हिम्मत करणार नाही.

जो कोण मावळा,
1) भर सभेत कोशारीचे धोतर फेडेल,
2) पडळकरला कॉलर पकडून जाब विचारेल
3) त्रिवेदीला कॉलर पकडून जाब विचारेल,
त्यांना मराठा परिवार तर्फे प्रत्येकी एक किलो चांदीचे कडे देऊन सन्मानित करण्यात येईल.
अशी घोषणा मराठा परिवाराचे संस्थापक अजित केरुरे यांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: