मुंबई 

शिवसैनिकांनी तोडली ‘अदानी’ची पाटी 

मुंबई (अभयकुमार देशमुख) :

छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळावला अदानी विमानतळ असं नावाची पाटी लावण्यात आलीय. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी विमानतळावरील अदानी विमानतळ नावाची पाटी तोडून टाकलीय.

 दरम्यान, या सर्व घटनेनंतर अदानी समूहाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “आधीच्या कंपनीच्या ठिकाणी आम्ही ब्रॅन्डिंग करत आहोत आणि हे ब्रॅन्डिंग सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांच पालन करुन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही किंवा या नावाच्या ब्रॅन्डिंगमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या निकषानु​​सारच या सर्व गोष्टी केल्या जातात. या ठिकाणी व्यवस्थापनाचे अधिकार असलेली आधीची कंपनी ही जीव्हीके कंपनी होती. जिथे जीव्हीकेचे ब्रॅन्डिंग होतं तिथे अदानी एअरपोर्ट ब्रॅन्डिंग करत आहे,” असे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: