सातारा 

‘शिवसेना आणि जनतेमधील नाते वृद्धिंगत करा’​

रहिमतपूर (महेश पवार) :

संपर्क साधल्याशिवाय संवाद करता येत नाही आणि संवादाशिवाय नाते निर्माण होत नाही. या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना आणि जनतेमधील नाते वृद्धिंगत करा, असे आवाहन शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे – पाटील यांनी केले.

खटाव तालुक्यातील नागाचे कुमठे येथे शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन प्रा. नितीन बानुगडे – पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव ,उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, तालुका प्रमुख युवराज पाटील, उपतालुकाप्रमुख महेश गोडसे, शाखाप्रमुख विजय मांडवे, उपशाखाप्रमुख विकास फडतरे, महिला संघटिका मनीषा मांडवे, सचिव नीलेश मांडवे, शाखा संघटक संजय फडतरे, राजकुमार मांडवे आदी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

प्रा. बानुगडे-पाटील पुढे म्हणाले, शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे.या अभियानाअंतर्गत गावोगावी शिवसेनेच्या शाखा सुरू करण्यात येत आहेत. जनतेबरोबर संवाद साधून पक्षाचे कार्य व भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्या  बरोबरच संघटन वाढवण्यावर भर दिला जात आहे. शिवसेनेने निवडणुकीपुरते राजकारण कधीच केले नाही. ऐंशी टक्के समाजकारणाचा वारसा घेऊनच सेना काम करत आहे. या कार्यामुळेच शिवसेनेबद्दल जनतेच्या मनात अपार विश्वास आहे. शिवसेनेच्या विषयी जनतेच्या मनात असलेला विश्वास हेच सेनेचे बळ आहे. या शिवसंपर्क अभियानातून शिवसेनेचे बळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत.शिवसेनेची प्रत्येक शाखा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचे केंद्रबिंदू ठरेल असे काम शिवसैनिकांनी करावे, असे आवाहन नितीन बानुगडे – पाटील यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: