क्रीडा-अर्थमतदेश-विदेश

‘शुटर दादी’ चंद्रो तोमर यांचे कोरोनामुळे निधन

​मेरठ :
60 व्या वर्षी नेमबाजी स्पर्धेत पाय ठेवून नंतर कित्येक स्पर्धा जिंकणाऱ्या शुटर दादी चंद्रो तोमर (Shooter Dadi Chandro Tomar) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मेरठमधील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. चंद्रो तोमर यांच्या अचानक जाण्यामुळे क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांची ‘शुटर दादी’ म्हणून भारतभर ओळख होती.
श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे चंद्रो तोमर यांना सोमवारी (26 एप्रिल) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. 26 एप्रिलपासून त्यांच्यावर मेरठमधील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, उपचाराला साथ न दिल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
चंद्रो तोमर हे नाव नेमबाजीमधील मोठं नाव आहे. आयुष्याच्या उत्तर काळात 60 वर्षाच्या झाल्यानंतर 1999 मध्ये त्यांनी नेमबाजीमध्ये पाऊल ठेवले. कसून सराव आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी त्यांच्या हयातीत 30 पेक्षा जास्त राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. त्या जगातील सर्वात वयस्कर नेमबाज असल्याचं म्हटलं जातं. त्या मुळच्या उत्तर प्रदेशमधील भागपूरमधील जोहरी जिल्ह्यातील आहेत. त्यांनी यापूर्वी आपली बहीण प्रकाशी तोमर यांच्यासोबत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे.​​
​त्यांच्या आयुष्यावर ‘सांड कि आँख’ या सिनेमाची निर्मिती झाली असून, यात त्यांची भूमिका साकारणाऱ्या तापसी पन्नू यांनी देखील दादींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!