सिनेनामागोवा 

गोव्यात आता सिने-मालिकांच्या चित्रीकरणावर बंदी

'गोवा फॉरवर्ड'च्या दणक्यानंतर सरकारचा निर्णय 

मडगाव:
महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मराठीतील बऱ्याच मालिकांनी चित्रीकरणासाठी गोव्याला पसंदी दिली. राज्यात विविध ठिकाणी त्या मालिकांचे चित्रीकरण सुरु देखील आहे. पण गोव्यात कोरोनाचा उद्रेक वाढला असताना अशा पद्धतीने मालिका आणि सिनेमाच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिल्याबद्दल नागरिकांमध्ये रोष होता. त्यामुळे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये सुरु असलेल्या ‘सूर नवा, ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणस्थळी जात त्यांना चित्रीकरण बंद करण्यास सांगितल्याने, सरकारने सावधानता बाळगत आता राज्यात एकूणच चित्रीकरणावर बंदी आणली आहे.
बुधवारी रवींद्र भवनात गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी जाऊन चित्रीकरण बंद पाडण्याचा इशारा दिल्यामुळे सरकारने राज्यातील चित्रीकरणावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. कोव्हिडच्या वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मनोरंजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन राज्यात सुरू असलेलं चित्रीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला मुख्य सचिव, गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य अधिकारी आणि उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई उपस्थित होते.
goa shootingराज्यात चित्रपट आणि कार्यक्रमांचं चित्रीकरण माठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यावर ताबडतोव बंदी आणण्याचा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला आहे. आता कोणालाही चित्रीकरणासाठी परवानगी दिली जाणार नाही आणि परवानगीशिवाय चित्रीकरण केल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर गंभीर करवाई केली जाईल, असा इशारा राज्यात गुरुवारपासून चित्रीकरणास बंदी मुख्यमंत्री सावंत यांनी दिला आहे.
गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार रामा काणकोणकर यांनी एका तारांकित हॉटेलमध्ये खुलेआम चित्रीकरण केले जात असल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या व्हिडीओत म्हटले होते  त्या प्रकरणाची आम्ही शहानिशा केली असून ते चित्रिकरण पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: