सातारा 

जनता पुरात आणि उदयनराजे मात्र अधिवेशनात

८० व्या वर्षी श्रीनिवास पाटील उतरले पाण्यात... 

सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील अनेक भागात सुरू असलेल्या पावसाने थैमान घातले यात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले. साताऱ्यातील जनतेचे हाल बघून त्यांना दिलासा देण्यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील आज इकडे येत आहेत. असे असताना या भागातील खासदार उदयनराजे भोसले हे अधिवेशनात असल्याचे सांगण्यात आले​. 

दुसरीकडे ​जिह्यातील दुसरे खासदार ​श्रीनिवास पाटील यांना जिल्ह्यातील पुर परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे समजताच अधिवेशन सोडून ​वयाच्या ​ऐंशीच्या ​वर्षात देखील पायाला भिंगरी बांधून पाटण ,वाई , महाबळेश्वर भागातील पिडित लोकांची भेट घेताना दिसत आहे​त, त्यामुळे जनता त्यांच्याकडे आपली परिस्थिती कथन करताना दिसत आहेत. खासदार पाटील हे जनतेला दिलासा देत आहेत. 
​दरम्यान, खासदार उदयनराजे यांची आजवरची एकूण अधिवेशनातील उपस्थिती खूपच कमी आहे. आणि आता जेव्हा मतदारसंघातील जनता पुराच्या पाण्यात असताना मात्र अधिवेशनात असल्याचे सांगण्यात आल्याने मतदारामध्ये ​​तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: