क्रीडा-अर्थमत

‘श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी’चा आयपीओ 14 रोजी होणार खुला

मुंबई :
श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने इक्विटी शेअरचा प्रारंभिक सार्वजनिक बोली/प्रस्ताव खुला करण्यात येणार आहे. हा व्यवहार (आयपीओ) सोमवार, 14 जून 2021 रोजी होणार असून बोली/प्रस्ताव बुधवार, 16 जून 2021 रोजी बंद होणार आहे. या प्रस्तावाचा किंमत पट्टा प्रती इक्विटी शेअर रु. 303 – रु. 306 याप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. कंपनी आणि विक्रेते समभागधारकांनी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) यांच्या सल्ल्यानुसार पायाभूत गुंतवणुकदारांचा सहभाग लक्षात घेतला असून त्यांचा सहभाग बोली/प्रस्ताव खुला होण्याअगोदर एक कार्यालयीन दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवार, 11 जून 2021 रोजी असणार आहे. 

या प्रस्तावाचा एकूण आकार रु. 909 कोटीएवढा असून यामध्ये ताजा रु. 657 कोटींच्या इक्विटी शेअरचा समावेश असेल आणि विक्रेत्या समभागधारकांकडून इक्विटी शेअरची ऑफर फॉर सेल सरासरी रु. 252 कोटींची राहील. ताज्या प्रस्तावातून मिळणाऱ्या रकमेचा विनियोग कंपनी स्वत:चे तसेच उपकंपन्या, श्याम एसईएल आणि पॉवर लिमिटेडची रु. 470 कोटी कर्जाचा पुनर्भरणा किंवा आगाऊ भरणा करण्यासाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांसाठी करेल.

हा समूह इंटरइमीजीएट आणि लॉंग स्टील उत्पादने जसे की आयरन पॅलेट, स्पंज आयरन, स्टील बायलेट, टीएमटी, रचनात्मक उत्पादने, वायर रॉड आणि फेर्रो अलॉय उत्पादनांचा उत्पादक आहे. त्याचे लक्ष विशेष स्टील वापराकरिता लागणारी हाय मार्जिन उत्पादने जसे की, कस्टमाईज बायलेट व विशेष फेर्रो अलॉयवर आहे. सध्या हा समूह आपल्या उत्पादन प्रकारांत वाढ करत असून पिग आयरन, ड्क्टल आयरन पाईप आणि अॅल्युमिनियम फॉईलमध्ये प्रवेश करतो आहे. या समुहाची प्रमुख क्षमता स्टील वॅल्यू चेन आणि ओडिशा तसेच पश्चिम बंगाल येथील रणनीतीत्मक निर्मिती प्रकल्पांमधील एकात्मिक कामकाजांवर केंद्रित आहे. पूर्व भारतामधील ही ठिकाणे रेल्वे, रस्ते मार्ग आणि बंदरांनी चांगल्याप्रकारे जोडलेली आहेत. रेल्वे सायडिंग आणि वीज प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांचा आधार लाभलेला आहे. ज्याचा वापर कंपनीच्या कामांसाठी करण्यात येतो.

Brij Bhushan Agarwalया समूहाच्या संभळपूर तसेच जामुरीया निर्मिती प्रकल्प फॉरवर्ड व बॅकवर्ड इंटीग्रेटेड आहेत. हा समूह स्टील वॅल्यू चेनमध्ये उपस्थित असून वैविध्यपूर्ण प्रोडक्ट मिक्स देऊ करतो. त्याच्या व्यापारी रणनीतीला साजेसे ठिकाण लाभले आहे. 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत समूहाच्या वीज प्रकल्पात उत्पन्न झालेल्या वीजेपैकी एकूण 79.58%  वीज कंपनीने वापरली. 31 डिसेंबर 2020 अनुसार या कंपनीचे भारतभर 13 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात 42 वितरकांचे वितरण जाळे होते. समूहाच्या स्थानिक ग्राहकांत जिंदाल स्टेनलेस (हिसार) लिमिटेड, आणि रिमझिम इस्पात लिमिटेड तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांमध्ये नोरेकॉम डीएमसीसी, नोरेकॉम लिमिटेड, पॉस्को इंटरनॅशनल कॉर्पोरेशन, वर्ल्ड मेटल्स अँड अलॉय (एफझेडसी), ट्राक्सीज नॉर्थ अमेरिका एलएलसी, जेएम ग्लोबल रिसोर्सेस लिमिटेड, गोयंका स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड आणि विजयश्री स्टील प्रायव्हेट लिमिटेडचा समावेश आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, एक्सिस कॅपिटल, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे प्रस्तावाचे बीआरएलएम आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: