क्रीडा-अर्थमत

‘​हे’ यंत्र करणार ​कार्यालयात कोरोनाला अटकाव

मुंबई​ :
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अजूनपर्यंत कोरोना महासाथीने मोठा तडाखा दिल्याचे दिसून येते. या साथीला जबाबदार असणाऱ्या करोना विषाणू संसर्गापासून कर्मचारी वर्गाला सुरक्षित ठेवण्यासाठी शहरातील कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. महासाथीला किनाऱ्यावरच थोपवण्याच्या अनुषंगाने अनेक कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान पर्यायाचा वापर करत आहेत. बंगळूरू येथील शायकॉकन (shycocan) कॉर्पोरेशनने मुंबईतील फिनाकस सोल्यूशन्सच्या तीन निरनिराळ्या कार्यालयांत ३० व्हायरस अटेन्यूएशन डिव्हाईस बसवली. फिनाकस सोल्यूशन्स ही प्रमाणित संघटना असून १०० हून अधिक वित्तीय संस्थांकरिता बँकिंग सोल्यूशन्स आणि पेमेंट सिस्टीम उपलब्ध करून देते. ग्राहकांना महासाथीत सुरळीत सेवा प्रदान करण्यासाठी अविरत कष्ट घेणाऱ्या कंपन्यांपैकी ही एक आहे. आपले ग्राहक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी ही कंपनी कायमच क्रांतिकारी तंत्रज्ञानयुक्त पर्यायांच्या शोधात असते.

हे उपकरण भिंतीवर सहज लावता येणारे असून त्याला शायकॉकन म्हणतात. करोना विषाणू आणि एन्फ्ल्यूएन्झा समुहातील विषाणूंपासून कंपनीच्या २५० हून अधिक कर्मचाऱ्यांचा बचाव करण्यात हे उपकरण उपयुक्त ठरते. त्यामुळे महासाथीची जोखीम कमी होते आणि कार्यालयीन परिसरात करोना संसर्ग होण्यापासून आळा बसतो. शायकॉकन (shycocan)अंतर्गत भागातील ९९.९% क्षमतेने करोना विषाणू आणि एन्फ्ल्यूएन्झा समूहाला मोठ्या प्रमाणात नष्ट करतो, असे जगभरातील विविध अधिस्वीकृत प्रयोगशाळांच्या विविध वायरोलॉजी रिपोर्ट अनुसार स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय, या उपकरणात कोणतेही रसायन, युव्ही रेज, रेडीएशन किंवा दुष्परिणाम होण्याची शक्यता नाही. ते मनुष्य, प्राणी व पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित आहे.

फिनाकस सोल्यूशन्सचे ग्लोबल मार्केटींग हेड अश्विन अय्यपन म्हणाले की, “आम्ही बँकिंग क्षेत्रात कार्यरत असल्याने महासाथीत २४x७ सेवा देणे क्रमप्राप्त ठरते. कारण एटीएमच्या देखभालीचे काम आमची कंपनी सांभाळते. महासाथीत डिजीटल पेमेंटचा वापर वाढल्याने आमचे कामदेखील वाढले. टाळेबंदीनंतर महासाथीत घराबाहेर पडणे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने जिकीरीचे बनले. कर्मचाऱ्यांना घराबाहेर येऊन ऑफिसमध्ये कामावर आत्मविश्वासाने परतणे आवश्यक होते. माझ्या ऑनलाईन संशोधनात मला शायकॉकनविषयी माहिती मिळाली. मी यंत्रांवर संशोधन-विकासाचे काम पूर्ण केले आणि पुढे जाऊन व्यवस्थापनासोबत आमच्या ३ निरनिराळ्या कार्यालयांत सुमारे ३० उपकरणे बसवली. कार्यालयात ते बसवल्यानंतर प्रादुर्भावाची कोणतीही केस आढळली नाही. त्यामुळे इतर संघटनांनी हे उपकरण स्वीकारावे अशी शिफारस मी करेन.”

शायकॉकनचे संशोधक डॉ. राजाह विजय कुमार म्हणाले की, हे खास उपकरण शक्तिशाली-धातूने तयार करण्यात आले आहे. ते तीव्रतेने फोटॉनची निर्मिती करते. एखाद्या भिंतीवर, फर्निचर, हवेतील धुलीकणात फोटॉन आदळले की त्यांचे परिवर्तन इलेक्ट्रॉनमध्ये होते. हे इलेक्ट्रॉन एखाद्या करोना विषाणू किंवा एन्फ्ल्यूएन्झा समुहातील विषाणूच्या सकारात्मक प्रोटीन कवचाशी चिकटून त्याला सकारात्मकता प्रदान करतात. ज्यामुळे इतर व्यक्तिना संसर्ग होण्यापासून बचाव होतो. शायकॉकन सुरू असताना एखाद्याने पृष्ठभागाला स्पर्श केल्यास विषाणूचा प्रभाव निष्प्रभ झाल्याने व्यक्तिचा संसर्गापासून बचाव होतो. शायकॉकन उपकरणाने आजवर अधिक चांगल्याप्रकारे सुरक्षा प्रदान केली आहे. यामधील शक्तिशाली-धातू फोटॉनची निर्मिती बराच काळ करत राहतात. ज्यामुळे शायकॉकन उपकरण दीर्घकाळ चालणारे आहे. त्याला अगदी कमी सर्विसिंगची गरज पडते आणि कोणत्याही कन्झुमेबलची आवश्यकता भासत नाही.

shycocanहे एक उपकरण बसवल्यास ते १,००० चौ. फू. (किंवा १०,००० क्युबिक फूट) क्षेत्रफळासाठी प्रभावी ठरते. मोठ्या प्रमाणावर अंतर्गत जागा सुरक्षित करायच्या असल्यास अनेक उपकरणे बसवता येतात. हे उपकरण अगोदरच भारत, अमेरिका, आणि युरोप, एशिया पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मध्य-पूर्व आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांत बसवण्यात आले आहे. संस्थात्मक खरेदीदारांकडून या उपकरणाला मोठी मागणी आहे. शायकॉकनमुळे शाळा, महाविद्यालये, घरे आणि हॉस्पिटल, हॉटेल, कार्यालये, रेस्टॉरंट, ऑडीटोरियम, वाहतूक, रिटेल आणि विमानतळांचे काम पूर्वपदावर येत आहेत. बाहेरील आणि आतील ग्राहकांकरिता सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यात सेवा प्रदान करते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: