गोवा 

लस घेणाऱ्यांना भंडारी समाजातर्फे अल्पोपहार 

डिचोली :
कारापूर येथील ज्ञानज्योती विद्यालयात कोविडं टीका उत्सवात लस घेणाऱ्या लोकांना गोमंतक भंडारी समाज डिचोली तालुका समितीतर्फे अल्पोपहार देऊन आगळी वेगळी सेवा करण्यात आली.
अध्यक्ष आनंद  नार्वेकर उपाध्यक्ष शैलु मांद्रेकार ,सिया गुरव  महिला अध्यक्ष जोस्ना चिबुलकर सरपंच गोकुलदास सावंत संतोष गुरव योगेश पेडणेकर नीता मोरजकार  उज्वला कवलेकर उपस्थित होते. या ठिकाणी आमदार प्रविण झाट्ये यांनी पाहणी करून टीका उत्सवाचा आढावा घेतला तसेच डिचोली  तालुका भंडारी समाजातर्फे लस घेणाऱ्यांना अल्पोपहार देऊन सेवा केल्याबद्दल अभिनंदन केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: