क्रीडा-अर्थमत

सोना कोमस्टारचा आयपीओ 14 जून रोजी बाजारात 

गुरुग्राम :
सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फॉरजिंग्स लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य वाहन तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असून ऑटोमोटीव्ह ओईएमला मोठ्या अभियांत्रिकीमिशन क्रिटीकल ऑटोमोटिव्ह सिस्टीम आणि सुट्या भागांची डिझाईननिर्मिती व पुरवठा करते. या कंपनीच्या इक्विटी शेअर ( “ऑफर”) च्या  सार्वजनिक प्रस्तावाची विक्री सोमवार14 जून 2021 रोजी सुरू होणार असून बुधवार16 जून 2021 रोजी विक्री व्यवहार बंद होईल. या प्रस्तावासाठी प्रती इक्विटी शेअर किंमत रु. 285 – रु. 291 पर्यंत ठरविण्यात आली आहे. कंपनी आणि विक्रेते समभागधारकांनी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) यांच्या सल्ल्यानुसार पायाभूत गुंतवणुकदारांचा सहभाग लक्षात घेतला असून त्यांचा सहभाग बोली/प्रस्ताव खुला होण्याअगोदर एक कार्यालयीन दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवार11 जून 2021 रोजी असणार आहे.

 

या प्रस्तावाचा एकूण आकार रु. 5,550 कोटीएवढा असून यामध्ये ताजा रु. 300 कोटींच्या इक्विटी शेअरचा समावेश असेल आणि विक्रेता समभागधारकसिंगापूर VII टॉपको III पीटीई लिमिटेडकडून  इक्विटी शेअरची ऑफर फॉर सेल सरासरी रु. 5,250 कोटींची राहील. ताज्या प्रस्तावातून मिळणाऱ्या रकमेचा विनियोग कंपनी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांशिवाय रु. 241.12 कोटी नमूद असलेल्या कर्जाचा पुनर्भरणा किंवा आगाऊ भरणा करण्यासाठी करेल.

ही कंपनी वेगाने वाढणाऱ्या जागतिक इलेक्ट्रीक वेहिकल (इव्ही) बाजारपेठांमधील अग्रगण्य पुरवठादार असून आर्थिक वर्ष 21 दरम्यान बॅटरी ईव्ही मार्केटमधून निर्माण होणारा महसूल 13.8% असेल आणि मायक्रो हायब्रीड / हायब्रीड मार्केटमधून निर्माण होणारा महसूल 26.7% असेल. 2020 कॅलेंडर वर्षाकरिता बीईव्ही डिफरेन्शीयल असेंब्लीजचा ग्लोबल मार्केट शेअर 8.7% होता. ही कंपनी 2020 कॅलेंडर वर्षाकरिता पुरवठा आकारमानाच्या आधारे डिफरेन्शीयल बेव्हेल गिअर मार्केट आणि स्टार्टर मोटर मार्केटमध्ये जगातील सर्वोच्च दहा मातब्बरांमध्ये येते. तिची उत्पादने जागतिक बाजारपेठेत चांगल्याप्रकारे विस्तारत आहेत. रिकार्डो अहवालानुसारही कंपनी सर्वोच्च 10 ग्लोबल पीव्ही ओईम्सपैकी 6सर्वोच्च 10 ग्लोबल सीव्ही ओईम्सपैकी 3 आणि आकारमानानुसार सर्वोच्च 8 ग्लोबल ट्रॅक्टर ओईएमपैकी 7 ला सेवा प्रदान करते. कंपनीकडे फोर्जिंगमेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल सिस्टिम तसेच बेस आणि अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये मजबूत संशोधन आणि विकासअभियांत्रिकी आणि तांत्रिक क्षमता आहेत. कंपनीच्या भौगोलिकउत्पादनेवाहन प्रकार आणि ग्राहकांमध्ये वैविध्यपूर्ण आढळते. क्रिसिल अहवालानुसारबाजारातील भांडवलाच्या आधारे भारतातील टॉप 10 सूचीबद्ध वाहन घटक उत्पादक कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीचे वित्तीय वर्षात सर्वाधिक कार्यरत ईबीआयटीडीए मार्जिनपीएटी मार्जिनआरओसीई आणि आरओई राहिले आहेत. त्यांनी सातत्याने 26% पेक्षा अधिक ईबीआयटीडीए मार्जिन दिले असून आर्थिक वर्ष 19-21 मध्ये प्रत्येक वर्षी 35% सरासरी आरओई त्याहून अधिक वितरित केले आहेत. वित्तीय वर्ष 16-20 दरम्यान  कामकाजी उत्पन्नाची वाढ समान सहयोगींच्या  सरासरीपेक्षा अधिक नोंदवली गेली.

 हा विक्री व्यवहार बुक बिल्डींग प्रोसेसद्वारे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टस (नियमन) नियम 1957 च्या  19(2)(बी) मधील सुधारणा (“SCRR”) सह नियमन 31 सेबी आयसीडीआर नियमन 6(2) सेबी आयसीडीआर नियमन आणि अनुपालनासह वाचा,  हा प्रस्ताव आधारीत बुक बिल्डींग प्रोसेसच्या माध्यमातून करण्यात येईल; (“सेबी आयडीसीआर नियम”)सुधारणेनुसार किमान 75%  पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) साठी राखून ठेवण्यात आला आहेविना-संस्थात्मक बोलीकर्ते (नॉन इन्स्टीट्युशनल बीडर्स)’ना 15% पेक्षा जास्त रकमेचे वाटप करता येणार नाही आणि इश्यूच्या 10% हून अधिकचे वाटप वैयक्तिक रिटेल बोलीकर्ते (रिटेल इंडीविज्युअल बीडर्स)ना करता येणार नाही.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेडक्रेडीट सुइज सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडजेएम फायनान्शियल लिमिटेडजे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे प्रस्तावाचे बीआरएलएम आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: