गोवा 

दक्षिण गोवा कॉंग्रेसतर्फे कोविड सामग्रीचे वाटप

मडगाव ​:
दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस तर्फे आज राहुल गांधींच्या वाढदिनी विवीध प्राथमिक आरोग्य केंद्रात व मडगाव आरोग्य केंद्रात आज एन-९५ मास्क तसेच सेनिटीयजर सारख्या कोविड सामग्रीचे वाटप करण्यात आले.

आमचे ​​राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या वाढदिनी कसलेही कार्यक्रम न करता केवळ कोविडचे रुग्ण व आरोग्य सेवा कर्मचारी यांना मदत करुन सेवा करण्याचे सांगितले आहे असे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस यांनी सांगितले.

आज दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी मडगाव आरोग्य केंद्र तसेच नावेली, चिंचोणे व लोटली आरोग्य केंद्रात भेट देवुन कोविड सामग्रीचे वाटप केले.

वेळ्ळी मतदारसंघातील आंबेली, असेळणा, वेळ्ळी व चिंचोणे पंचायतीतही सदर सामग्रीचे वाटप करण्यात आले.

दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, उपाध्यक्ष दीपक खरंगटे व ॲड. येमेनी डिसोजा, खजिनदार पिटर गोम्स यांनी आज सदर आरोग्य केंद्राना भेट दिली व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

goa congress

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: