गोवा 

सभापती राजेश पाटणेकरांनी दिले सॅनिटायझर पंप भेट

डिचोली (प्रतिनिधी) :
गोव्याचे सभापती व डिचोली मतदारसंघाचे आमदार राजेश पाटणेकर यांनी डिचोली तालुक्यातील साळ ग्रामपंचायतीला सॅनिटायझर स्प्रे पंप भेट स्वरूप उपसरपंच वर्षा साळकर व पंच बिंदिया राऊत यांच्याकडे सुपूर्द केला.
देशात नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साळ ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमातहा पंप  सुपूर्द केला. यावेळी पंच प्रकाश राऊत , पंच बिंदिया राऊत , तमर नाईक  महिला मंडळ – खोलपे च्या अध्यक्षा व भाजपा कार्यकर्त्या सपना शिरोडकर,  भाजप कार्यकर्ते मोहन राऊत , गोपी राऊत , तसेच सचिव पुंडलिक गावस , सहसचिव शांबा घुरे , आनंद राऊत,  सर्वेश चांदेलकर आदी उपस्थित होते.
सभापती राजेश पाटणेकर यांनी साळ ग्रामपंचायतीतील कर्मचारी व पंचमंडळी कोविड काळात चांगली सेवा देत असून त्यामध्ये नागरिकही आपापली कार्यालयीन कामे करून घेत आले आहेत . तरी असताना कोविड  काळात प्रत्येकाने आपापली काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे सांगितले .
पंच प्रकाश राऊत यांनी साळ मधील नागरिकांनी व कार्यालयीन कर्मचारी  यानी कोविड – १९ च्या नियमावलीचे पालन करून सॅनिटायझर स्प्रे पंप योग्य प्रकारे  हाताळावा असे आवाहन केले
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: