मुंबई 

कॉ. सुबोध मोरे यांचे आज विशेष व्याख्यान

मुंबई :
नुकत्याच झालेल्या कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि कार्ल मार्क्स जयंती निमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ‘महाराष्ट्राचे दीपस्तंभ’ या विशेष व्याख्यानमालेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, 20 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता विविध सामाजिक माध्यमांतून प्रसारित होणार्‍या या व्याख्यानमालेमध्ये डाव्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. सुबोध मोरे हे लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे, कॉ. अमर शेख आणि कॉ. द. ना. गव्हाणकर यांच्यावर सविस्तर बोलणार आहेत. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर असणार आहेत. सदर व्याख्यानाचा लाभ अधिकाधिक जणांनी घ्यावा असे आवाहन पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

सदर व्याख्यान ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: