क्रीडा-अर्थमत

खलाशांच्या सेवेसाठी ‘या’ बॅंकेची विशेष सेवा 

मुंबई :
जहाजांवर सेवेत असलेल्या ग्राहकांच्या समूहासाठी फेडरल बॅंकेने विशेष एनआर बचत खाती योजना लॉंच केलीही योजना दूर समुद्रात जहाजांवर काम करणार्‍यांसाठी विशेष लाभ देण्याच्या दृष्टीने बनवण्यात आली असूनत्यांना डिजीटल बॅंकिंग प्लॅटफॉर्म्सच्या साह्याने उत्कृष्ठ सेवा प्रदान करण्यासाठी आणि भौगोलिक स्थानांच्या आणि टाईम झोन्सच्या मर्यादांनुसार व्यवहारांमध्ये खंड पडू नये अशा दृष्टीने तयार करण्यात आले आहे. ही योजना एनआरई एसबी आणि एनआरओ एसबी या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

या योजनेमध्ये प्रदान करण्यात आलेल्या सुविधांमध्ये मासिक परकीय चलनप्राप्तीस्थानिक एअरपोर्ट लाउंजच्या अ‍ॅक्सेससह प्रीमियम डेबिट कार्डजोडलेले झिरो बॅलंस एनआरओ खाते आणि गरजेनुसार आर्थिक नियोजन आणि कस्टमाईझ केलेले आर्थिक व्यवस्थापन उत्पादने आणि सेवा. 

खात्याची योजना अधिकृतरीत्या लॉंच केली जात असताना बॅंकेच्या कार्यकारी संचालिका शालिनी वॅरियर म्हणाल्या बिगरनिवासी ग्राहक विभागामध्ये फेडरल बॅंक कायमच आघाडीवर राहिली आहेया व्यवसायामधील 6.6% पेक्षा अधिक बाजारभागासह भारतामधील वैयक्तिक परकीय चलनप्राप्तीमधील 17% पेक्षा अधिक भागासह, “डिजीटल सेवेवर भरमनुष्य मध्यावर” या मंत्राला बॅंक जागते. हे अत्यंत वेगळे उत्पादन आपल्यापैकी जहाजांवर काम करणार्‍यांच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी बनवण्यात आले आहे. यातील अत्यंत वेगळी वैशिष्ट्ये आणि लाभ हे जहाजावर सेवेत असलेल्या ग्राहकांच्या वाढत्या संख्येला अधिकाधिक आकर्षक लाभ प्रदान करेल यात शंका नाही”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: