क्रीडा-अर्थमत

‘हि’ कंपनी देणार व्हॉट्सअॅपवर विमा सेवा

पणजी :

 ग्राहकांना सुरळीत सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवून, स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स या भारतातील पहिल्या स्टॅण्डअलोन विमा कंपनीने, आज, आपल्या ग्राहकांसाठी, व्हॉट्सअॅप सेवेची घोषणा केली.

सोशल मीडिया अॅप्लिकेशनच्या माध्यमातून, स्टार हेल्थचे ग्राहक एण्ड-टू-एण्ड, अर्थात पॉलिसीच्या खरेदीपासून ते दाव्यापर्यंत, सर्व सेवा व्हॉट्सअॅपद्वारे काही क्लिक्समध्ये प्राप्त करू शकतात. ग्राहकांनी फक्त त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून +९१ ९५९७६ ५२२२५ या स्टार हेल्थ व्हॉट्सअॅप सेवा क्रमांकाला “हाय (Hi)” असा संदेश पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्राहक, झटपट पॉलिसी खरेदी करणे, कॅशलेस दावा फाइल करणे किंवा पॉलिसी दस्तावेज डाउनलोड करणे आदी कामे त्यांच्या सोयीनुसार, सुलभतेने करू शकतील.


ग्राहकाला प्राप्त झालेली व त्याने शेअर केलेली माहिती संरक्षित व गोपनीय राहील याची काळजी व्हॉट्सअॅप मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील एन्क्रिप्शनद्वारे घेतली जाते.


कंपनीने सुरू केलेली व्हॉट्सअॅप सेवा हा त्यांच्या थ्रीसिक्स्टी डिग्री सपोर्ट उपक्रमाचा एक भाग आहे. यामुळे ग्राहकांना अनेकविध मार्गांद्वारे कंपनीशी संवाद साधण्याची मुभा मिळते.
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद रॉय, डिजिटल प्लॅटफॉर्मवर नव्यानेच लाँच केलेल्या थ्रीसिक्स्टी डिग्री सेवेबद्दल, म्हणाले, “स्टार हेल्थमध्ये विम्याशी संबंधित दावे व भरपाईचा मुद्दा येतो, तेव्हा आम्ही ग्राहकांचा अनुभव उत्तम असावा यासाठी कायम प्रयत्नशील असतो. ग्राहक सातत्याने उत्क्रांत होत आहेत, तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्स वापरत आहेत, त्यामुळे आम्हालाही त्यांच्याशी सुसंगत राहायचे आहे. भारतात व्हॉट्सअॅपची लोकप्रियता व व्याप्ती अफाट आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी आणि त्यांच्याशी अधिक चांगला संवाद साधण्यासाठी हा आदर्श प्लॅटफॉर्म आहे असे आम्हाला वाटते. यामुळे आम्हाला आमच्या पॉलिसीधारकांशी कधीही, कोठूनही जोडून घेणे शक्य होईल, विशेषत: त्यांच्या गरजेच्या काळात, तर हे खूपच उपयुक्त ठरेल असे आम्हाला वाटते.”

व्हॉट्सअॅप मेसेजिंगशिवाय, कंपनीचा चॅट असिस्टण्ट ट्विंकल, ग्राहकसेवा क्रमांक, एजंट्स, अधिकृत वेबसाइट, शाखा कार्यालये व स्टार पॉवर अॅप यांद्वारे, स्टार हेल्थ ग्राहक विमा कंपनीशी संपर्क साधू शकतातच. अशा रितीने सर्व ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या माध्यमाद्वारे आवश्यक सेवा उपलब्ध करून घेण्याची संपूर्ण सुविधा कंपनीने पुरवली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
%d bloggers like this: