गोवा 

‘राज्याला इव्हर्मेक्टिनची नाही तर लसींची अधिक गरज’

पणजी :
आपच्या गोवा वैद्यकीय कक्षाचे प्रमुख डॉ. मारियान्हो गोडीन्हो यांनी गोव्याला इव्हर्मेक्टिनच्या (ivermectin) गोळ्या देण्याच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित केला की,”जेव्हा देशातील इतर राज्यांसह जगात कुठेही ही टॅब्लेट रोगप्रतिबंधक उपचारांसाठी वापरली जात नाही. आणि रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी तर नाहीच नाही. (WHO) जागतिक आरोग्य संघटनेने  विशेषत: त्याच्या वापराची शिफारस केलेली नाही आणि जगात इतरत्र कोठेही तो स्वीकारला जात नाही. सद्यस्थिती गोयंकरांना इव्हर्मेक्टिनच्या (ivermectin)  गोळ्या नव्हे तर कोविडचा प्रसार रोखण्यासाठी पुरेशा लशींची गरज असल्याचे आपच्यावतीने सांगण्यात आले.
aap goaयावेळी आपचे गोवा निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी सांगितले की, गेल्या 19 दिवसांत कोविडमुळे 1000 हून अधिक गोवावासीयांचा मृत्यू झाला आहे. मात्र जेव्हा यावर प्रश्न उपस्थित केले जाता त्यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे मात्र नेमलेल्या तथाकथित तज्ज्ञ कमिटीचा उल्लेख करतात. पण वास्तवात या समितीत कुठलाही तज्ज्ञ व्यक्ती नाही. राणे या तथाकथित समितीच्या एकाही सदस्याचे नाव का घेत नाही?,” असा प्रश्नही राहुल यांनी विचारला.

दरम्यान,  सरकारने या औषधांचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या की नाही ते सांगावे?  जर असेल तर हा करार कोणाकडे होता आणि किती पैसे यासाठी मोजले,ते स्पष्ट करावे, अशी मागणी करतानाच, डॉक्टर असोसिएशनचा हवाला देत राहुल यांनी सांगितले कि, भारतीय वैद्यकीय संघटनेशीसुद्धा इव्हरमेक्टीनच्या विषयी सल्ला मसलत केली गेली नाही.  सदर गोळ्या गोव्यावर जबरदस्ती थोपविल्याचा गेल्या असून, या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठी भाजपला फंड गोळा करायचा आहे, आरोप म्हांबरे यांनी केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: