सातारा 

जिल्ह्यात कडक लॉकडॉऊन; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त…

सातारा (अभयकुमार देशमुख) :
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २५ मे पासून कडक लॉकडॉउन जाहीर केला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी हा आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले आहे.
कडक लॉकडॉउनच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन लॉकडॉउनचे नियम मोडणाऱ्याविरोधात कठोर पावले उचलताना दिसत आहेत. कराड शहर आणि परिसरात पोलिस प्रशासनाने जागोजागी नाका बंदी करुन विनाकारण फिरणा-यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारुन प्रत्येक वाहनांची तपासणी करुन चौकशी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोनाची चेन मोडणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील नियम पाळून स्वतःची काळजी घ्यावी. आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
satara
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: