सातारा 

साताऱ्यात घंटागाडी चालक व हेल्पर यांचे काम बंद आंदोलन

सातारा (महेश पवार) :
शहरात आज सकाळपासून घंटा गाडी चालकांनी काम बंदचे आंदोलन केले आहे पगार वेळेत होत नसल्याने हे आंदोलन केल्याचे गाडीवरील कामगारांनी सांगितले.

साताऱ्यातील घन कचरा गोळा करणाऱ्या सुमारे 40 ते 45 घंटागाडय़ावरील  कामगार व हेल्पर यांचे पगार वेळेत होत नसल्याकारणाने आज सकाळपासून कामगारांनी घंटागाडी बंदचे आंदोलन केले. गेल्या काही महिन्यांपासून पगार वेळेत होत नसल्याकारणाचे हे आंदोलन केल्याचे कामगारांनी सांगितले . घंटागाडी कामगारांना कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवली जात नाही कोव्हिड कचरा उचलताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा सॅनिटायझर किंवा मास्क दिले जात नाहीत. जर पगार वेळेत मिळाला तर आम्ही आमच्या खर्चाने सॅनिटायझर घेऊन आमची सुरक्षा आम्हीच करु परंतु पगारच होत नसल्याने आमचे  पोट भरायचे का सॅनिटायझर विकत घ्यायचे? असा प्रश्न  या घंटागाडी कामगारांनी  केलेला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: