गोवा 

‘मांद्रे’च्या सरपंचपदी सुभाष आसोलकर बिनविरोध

पेडणे (प्रतिनिधी) :
माजी सरपंच अश्वेता मांद्रेकर यांनी सरपंचपदाचा ४ एप्रिल दरम्यान राजीनामा दिल्यानंतर मांद्रे पंचायतीचे सदर पद रिक्त होते. त्यानंतर आज मंगळवार दि.८ रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीत सुभाष आसोलकर यांचा एकमेव अर्ज सरपंचपदासाठी आला. यावेळी पंच सदस्य राघोबा गावडे, अश्वेता मांद्रेकर, प्रिया कोनाडकर,सेरेफीना फेर्नांडीस,आंब्रोज फेर्नांडीस,महादेव हरमलकर आदींनी त्यांना समर्थन दिल्यामुळे सुभाष आसोलकर यांची बिनविरोध निवड झाली.

एकूण पंचायत सदस्यांपैकी त्यांना ७ सदस्यांचे समर्थन लाभले. यावेळी गट विकास कार्यालयाचे अधिकारी मुरारी वराडकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना पंचायत सचिव अविनाश पाळणी यांनी सहकार्य केले.

दरम्यान नवनिर्वाचित सरपंच आसोलकर यांनी सांगितले कि, एका सरपंचांचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्याची निवड केली जाते. तीच पद्दत अनुसरून सरपंचपदासाठी आपली बिनविरोध निवड झाली असून पंचायत मंडळांतील सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने मांद्रे पांचायत क्षेत्रांतील विकासकामांना प्राधान्य दिले जाणार आहे. विकासकामांच्या बाबतीत आतांपर्यंत भेदभाव झाले नाहीत आणि यापुढेही ते होणे नाही.मागील आपल्या प्रभारी सरपंचपदाच्या एका महिन्याच्या कारकिर्दीत ५०  लाखांची कामे १४ व्या वित्तआयोगामार्फत पूर्णत्वास नेली आहेत. तसेच सद्या १० लाख रुपये खर्चून कचऱ्यासाठी शेडचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव मंजुरीस आहे. पंचायत क्षेत्रांतील गटार व्यवस्था सुरळीत करण्याच्या कामाची निविदा पूर्ण झालेली आहे. केवळ कोविड १९ मुळे लॉकडाऊन असल्याने कामगारांअभावी गटार दुरुस्ती व स्वच्छता कामे राहून गेली लवकरच या सर्व कामांना सुरवात केली जाणार  आहे.तसेच सच्चे भाटले येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी १२० मीटर लांबीच्या गटाराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून त्याद्वारे रस्त्यावर साचलेले पाणी ओहोळांत सोडण्यात येणार आहे.पंचायतीकडे असलेल्या १ कोटी ९ लाखांपैकी ६० टक्के निधी विकास कामांसाठी पंचायतीने आतांपर्यंत वापरलेला आहे.या विकासकामांसाठी कोणाचेच दुमत नाही. कोविड १९ महामारीला सामोरे जाताना मांद्रे पंचायत व मांद्रे कोविड टास्क फोर्स यांचा मांद्रे पंचायत क्षेत्रासाठी विलगीकरण कोविड केंद्र उपलब्ध व्हावे असा प्रस्ताव होता.त्या प्रस्तावाला  उदरगत संस्थेचे अध्यक्ष व मगोचे युवा नेते जीत आरोलकर यांनी पंचायतीच्या या प्रस्तावाला  संमत्ती दर्शवून एक सुसज्ज व सर्व सोयीसुविधा नियुक्त विलीगीकरण कोविड केंद्र उपलब्ध करून दिले.एकूण ७० नागरिकांनी या केंद्राचा लाभ घेतला. त्यांच्या या योगदानाबद्दल जीत आरोलकर यांचे मांद्रे पंचायत व मांद्रे कोविड टास्क फोर्स समिती अत्यंत ऋणी आहे.मांद्रे मतदार संघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी आतापर्यंत पंचायतीच्या विकास कामांना पूर्ण सहकार्य केलेले आहे.विकास कामांत त्यांनी कधी राजकारण आड आणले नाही.असेच सहकार्य यापुढेही अपेक्षित असल्याचे सरपंच सुभाष आसोलकर स्थानिक पत्रकारांकडे बोलताना म्हणाले.

माजी सरपंच अश्वेता मांद्रेकर म्हणाल्या कि,आपल्याला सरपंचपदी अनेक अनुभव आले आणि बऱ्याच नविन गोष्टी ज्ञात झाल्या.आस्कावाडा येथील प्रभागांत पांच विहिरींची दुरुस्ती,पंचायतीच्या नविन इमारतीची निविदा व मांद्रे शिक्षण संस्था आणि राष्ट्रोळी देवस्थानच्या कामाची निविदा मंजुर झाली तसेच अन्य कांही कामे मिळून अंदाजित १५ – १६ लाखांच्या विकास कामांना चालना दिल्याचे अश्वेता मांद्रेकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान मगोचे युवा नेते जीत आरोलकर यांनी सरपंचांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: