गोवा 

‘स्वतःची  काळजी घ्या; डॉक्टरांचा ताण कमी करा’

मडगाव :
कोविड महामारीने आज डॉक्टरांवर अधिक जबाबदारी आली आहे. गोव्यातील सर्व डॉक्टर रात्रंदिवस लोकांचे प्राण वाचविण्यासाठी झटत आहेत. अनेक कुटुंबियांसाठी देवदूत होऊन त्यांनी अनेकांचे प्राण वाचविले आहेत. आपण सर्वांनी या कोविड महामारीच्या कठिण काळात स्वतःची काळजी घेत डॉक्टरांवरील त्राण कमी करावा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी केले.

दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात आयोजित कोविड महामारीत अविरतपणे सेवा देणाऱ्या काही डॉक्टरांचा आज सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस उपस्थित होते.

लोकांची सेवा करण्यास आम्ही बांधील असुन प्रयत्नांची पराकाष्ठा करुन जीव वाचविण्यासाठी कर्तव्य भावनेने आम्ही सर्व आरोग्य सेवक काम करीत आहोत. लोकांनी कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. डॉक्टरांवर अनेक मर्यादा असतात व वेळीच रुग्ण दाखल झाल्यास त्यांना योग्य इलाज करणे सोपे जाते. लोकांनी कोविडच्या महामारीत सर्व मर्यादा पाळुनच वागावे. कॉंग्रेस पक्षाने आमच्या कार्याची दखल घेवुन आमचा सन्मान केला याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत असे उद्गार डॉ. राजेश नायक यांनी यावेळी सन्मान केलेल्या सर्व डॉक्टरांच्या तर्फे बोलताना काढले.

माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांच्या हस्ते डॉ. व्यंकटेश मळये, डॉ. राजेश नायक, डॉ. प्रविण भट यांचा सन्मान करण्यात आला. विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी डॉ. राजेश्वर नाईक, डॉ. सॅम्युएल अरवतगी व डॉ. सुजोय दास यांचा गौरव करण्यात आला. नावेलीचे आमदार लुईझिनो फालेरो यांनी डॉ. मिलींद देसाई, डॉ. सुधिर शेट व डॉ. राजेश जवेरानी यांचा सन्मान केला. माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी डॉ. ब्रेनान तावारिस व डॉ. शशांक प्रभुदेसाई यांचा गौरव केला.

दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस यांनी आजच्या सन्मान कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे आभार मानले. कोविड महामारीत बंधने असल्यांने इतर आरोग्य सेवकांचा सन्मान नंतर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे प्रत्येक आरोग्य केंद्राना भेट देवुन आम्ही आरोग्य सेवकांचा सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष दीपक खरंगटे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पिटर गोम्स व रोयला फर्नांडिस यांनी केले.

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई, ॲड. येमेनी डिसोजा, शिवानी पागी, फ्लोरीयानो कुलासो तसेच इतर कॉंग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: