देश-विदेश

विकासासाठी तालिबानचं चीनला आमंत्रण

चीनने अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि सलोखा वाढवण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावली आहे आणि त्यामुळे त्यांचे देशाच्या पुनर्बांधणीत योगदान देण्यासाठी आपले स्वागत आहे असे तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी चीनच्या माध्यमांना सांगितले आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर हजारो नागरिकांनी तेथून पळ काढला आहे. २० वर्षांपूर्वीच्या तालिबान राजवटीत लादलेल्या इस्लामिक कायद्याच्या कठोर कायदे परत येण्याची अनेकांना भीती वाटत असल्याचे म्हटले जात आहे.

“चीन एक मोठी अर्थव्यवस्था आणि क्षमता असलेला मोठा देश आहे. मला वाटते की ते अफगाणिस्तानच्या पुनर्वसन, पुनर्बांधणीमध्ये खूप मोठी भूमिका बजावू शकतात,”असे शाहीनने गुरुवारी रात्री उशिरा सीजीटीएन टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गेल्या महिन्यात तियानजिनमध्ये तालिबानच्या शिष्टमंडळाशी भेट घेतली होती आणि त्यांना आशा आहे की अफगाणिस्तान इस्लामी धोरण स्वीकारू शकेल असे म्हटले होते.

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गुरुवारी जगाने अफगाणिस्तानला पाठिंबा द्यावा, त्यावर दबाव आणू नये असे म्हटले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी ब्रिटीश परराष्ट्र सचिव डोमिनिक राब यांच्याशी फोनवर बोलताना सांगितले की, “जगाने अफगाणिस्तानला मार्गदर्शन आणि पाठिंबा द्यावा, त्यावर अधिक दबाव आणू नये, कारण अफगाणिस्तानमध्ये सध्या सत्ता हस्तांतरण सुरू आहे.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: