देश-विदेश

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण!

बंगळुरू :
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कर्नाटकात भाजपात सर्वकाही अलबेल नसल्याचं सध्या चित्र आहे. त्याचबरोबर येडीयुरप्पा यांचं वाढतं वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार सुरु असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या सर्व बातम्यांना मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. “भाजपा नेतृत्वाने मला पद सोडण्यास सांगितल्यास मी त्या दिवशीच राजीनामा देईल.” असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरी दुसरा पर्याय नसल्याचं सांगायला विसरले नाहीत. तर दुसरीकडे येडीयुरप्पा समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल असंही सांगितलं.

“मला पक्ष नेतृत्वाने राजीनामा देण्यास सांगितलं. तर मी तात्काळ राजीनामा देईन. पण मला वाटतं कर्नाटक भाजपात दुसरा पर्याय नाही. जिथपर्यंत दिल्लीतील नेतृत्वाला माझ्यावर विश्वास आहे. तिथपर्यंत मी मुख्यमंत्रिपदावर राहणार. ज्या दिवशी सांगतील राजीनामा दे, त्या दिवशी राजीनामा देईन आणि राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र काम करेन” असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी सांगितलं.

“त्यांचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. याबाबतची कोणतीच चर्चा नाही. त्यांनी फक्त वक्तव्य केलं की, पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल. कारण ते पक्षाचा आदेश मानणारे नेते आहेत.”, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएम नारायण यांनी सांगितलं.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: