देश-विदेश

४ हजार कोटींच्या कोविड रिलीफ फंडाची घोषणा

​चेन्नई :​
​तब्बल दहा वर्षानंतर सत्तांतरण झाल्यानंतर तामिळनाडूमध्ये द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी कालच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी पहिल्याच दिवशी राज्यातल्या २.०७ कोटी कुटुंबांसाठी कोविड रिलीफ फंड म्हणून ४ हजार १५३ कोटींची घोषणा केली. त्यासोबतच आविन दुधाच्या किंमती ३ रुपयांनी कमी केल्या. त्यामुळे स्टालिन यांच्या कामाच्या धडाक्याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

२०१६मध्ये बऱ्याच वर्षांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांनाच तामिळनाडूनं निवडून दिलं होतं. पण २०२१मध्ये जयललितांच्या एआयडीएमकेकडू सत्ता घेत ती तामिळी जनतेनं द्रमुकच्या झोळीत घातली. ​आता १० वर्षांनंतर सत्तेत येताच द्रमुकनं ​विविध घोषणांसोबतच ​तब्बल ९ मंत्रालयांची नावंच बदलून टाकली!

​सरकारने पुढील प्रमाणे मंत्रालयाच्या नव्या ​नावाची घोषणा केली आहे.

कृषी विभाग –  कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग
पर्यावरण विभाग – पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग
आरोग्य विभाग – मेडिकल आणि कुटुंब कल्याण विभाग
मत्स्य व्यवसाय विभाग – मत्स्य आणि मासेमार कल्याण विभाग
कर्मचारी विभाग – कर्मचारी कल्याण आणि कौशल्य विकसन विभाग
माहिती आणि जनसंपर्क – माहिती आणि प्रचार विभाग
सामाजिक कल्याण – सामाजिक कल्याण आणि महिला सक्षमीकरण विभाग
कार्मिक आणि व्यवस्थापन सुधारणा – मनुष्यबळ विकास व्यवस्थापन
अनिवासी भारतीय – अनिवासी तामिळ कल्याण विभाग

tamilnadu​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: