गोवा 

‘तरुण तेजपालच्या निर्दोषत्वाला देणार उच्च न्यायालयात आव्हान’

पणजीः
सहकारी महिलेने केलेल्या लैगिंक अत्याचाराच्या आरोपातून तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता झाल्याचा निवाडा राज्य सरकारला पसंद पडला नसून, सरकार या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. सत्र न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया देतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबद्दल सूतोवाच केले.

​​गोव्यात एका महिलेवर झालेला अन्याय अजिबात सहन केला जाणार नाही. त्याही पुढे जाऊन अशा प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. जिल्हा न्यायालयाने तरुण तेजपाल प्रकरणात दिलेला हा निकाल नक्कीच समाधानकारक नाही. त्यामुळे लवकरच आम्ही याविरुद्ध हायकोर्टात आव्हान देणार आहोत. तसंच याविषयी मी स्वतः पब्लिक प्रॉसिक्यूटर आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर यांच्याशी हायकोर्टात या निकालाला आव्हान देण्याबद्दल चर्चा करणार असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी माध्यमांना सांगितले. ​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: