गोवा 

‘चक्रीवादळांपासून नागरिकांचा जीव कधी वाचवणार?’

आम आदमी पक्षाने विचारला राज्य सरकारला थेट सवाल 

पणजी :
वर्ल्ड बँकेच्या मदतीने शेकडो कोटींचे बजेट असूनही, चक्रीवादळाची जोखीम कमी करण्याची महत्त्वपूर्ण कामे वेळेवर न केल्याबद्दल आम आदमी पक्षाने भाजप सरकारवर टीका केली. ऑक्सिजन पुरवठा आणि कोव्हीड सज्जतेच्या विषयावर असणारी उदासीनता शेकडो गोवेकरांच्या जिवावर बेतली आहे, असे सांगत आपचे नेते कॅप्टन वेंझी व्हिएगास यांनी शेकडो गोवेकरांच्या मृत्यूनंतरच मुख्यमंत्री सावंत चक्रीवादळ संरक्षण उपायांवर कार्य करतील का? असा सवाल केला.

गेल्या काही दिवसांपासून वादळाचा मागोवा घेत असलेले कॅप्टन व्हिएगास म्हणाले की, गोवा आज चक्रीवादळ तौकतेच्या (tauktae) नजरेत येण्यासारख्या धोकादायक वळणावर आले आणि चक्रीवादळाच्या अंदाजित मार्गामध्ये केवळ शेवटच्या क्षणी झालेल्या बदलामुळे राज्य मोठ्या विनाशापासून वाचले. कॅप्टन व्हिएगास म्हणाले की, जुलै २०१५ मध्ये राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम कमी करण्याच्या कार्यक्रमात गोव्याचा इतर किनारपट्टीतील राज्यांसह समावेश होता, ज्यांचे बजेट २३६१.३५ कोटी होते. परंतु गेल्या काही वर्षात गोवा सरकारने विविध घोषणा करूनही, केवळ पायाभरणी आणि फोटो काढण्या इतपतच कार्यक्रम झाले, त्यामुळे आजही मोठ्या चक्रीवादळाच्या घटनेला तोंड देण्यासाठी गोवा अपूर्ण तयारीत आहे,असे कॅप्टन व्हिएगास म्हणाले.

“चक्रीवादळ निवारा,खारट बंधारा इत्यादीसारख्या प्रकल्पांना कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रस्तावित करण्यात आले होते, परंतु अद्यापपर्यंत कोणालाही यात प्रकाश दिसू शकला नाही. ऑक्टोबर २०२० पर्यंत, मुख्यमंत्री सावंत यांनी जाहीर केले होते की, गोव्यातील विविध ठिकाणी १२ बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा (एमपीसीएस) प्रकल्प सुरू आहेत आणि त्यांनी दावा केला की,यातील ५० ते ८०% काम आधीच पूर्ण झाले आहे, परंतु अद्याप कोणीही ते पाहिले नाही”,  कॅप्टन. व्हिएगास म्हणाले की, अशी आश्रयस्थाने वेळेवर पूर्ण झाली असती,तर ती जरी चक्रीवादळ संरक्षणासाठी वापरली गेली नसती तरी ती तात्पुरती कोविड अलगीकरण सुविधा केंद्रे म्हणून वापरता आली असती.

tauktaeकिनाऱ्यावर व्यापक हानी होण्याच्या वृत्तांचा संदर्भ देताना कॅप्टन व्हिएगास यांनी शोक व्यक्त केला की, गोव्यातील आपत्तीची पूर्वतयारी पुन्हा उघडकीस आली असून, राज्यभरात मोठ्या प्रमाणात वीज गेल्याने आणि पुराची परिस्थिती निर्माण झाल्याने हे अधिक स्पष्ट होते. व्हिएगास यांनी आरोप केला की, भाजपा सरकार केवळ निवडणुकांसाठी किंवा आमदार विकत घेताना सक्षम आणि प्रबळ आहे आणि गोव्याचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माध्यमांमधे प्रतिकूल प्रसारण येईपर्यंत त्यांना शासन करण्यास किंवा प्राण वाचविण्यात रस नाही.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: