गोवा 
Trending

‘तौक्ते’मुळे राज्यात त्रेधा; ठिकठिकाणी कोसळली झाडे

​​पणजी :
केरळच्या किनाऱ्यावरून ​आलेल्या ‘तौक्ते’ (taukte) चक्रीवादळामुळे राज्यात कालपासून मोठी हानी झाली असून, राज्यात ठिकठिकाणी तुफानी वाऱ्यामुळे झाडे कोसळून नुकसान झाले आहे. पणजीत भाऊसाहेब बांदोडकर मार्गाव​रील कला अकादमीसमोर पार्क केलेल्या वॅगनआर गाडीवर झाड कोसळले आहे. त्याचप्रमाणे आयनॉक्स’समोरदेखील एक झाड कोसळ​ले आहे. त्याचवेळी आता बेतीम जंक्शन येथील गोवेकर वाईन शॉपवर शेजारील माड कोसळला आहे तर आगशी देशीभाट येथे देखील भर चौकात झाड पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.  यामुळे या सगळ्या भागातील वाहतूक खंडित झाली आहे. तसेच ठिकठिकाणी विजेच्या तारांवर झाडे कोसळल्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
​दरम्यान​, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. ​
goa goa goagoa
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: