गोवा 

हंगामी शिक्षकांना सेवेत कायम करण्याची मागणी

पेडणे (प्रतिनिधी) :

तासिका तत्वावरील शिक्षकांच्या मानधनात २५० रू.वरून ५०० रू वाढ करणे,अनेक वर्षे हंगामी तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना सेवेत कायम करणे ,प्रथम सत्रात सेवा निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना शैक्षणिक वर्षा अखेर पर्यंत सेवेत ठेवणे तसेच उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे सभासदनोंदणीस आकारण्यात येणाऱ्या शुल्क मान्यता देणे अश्या मागण्या अखिल गोवा उच्चमाध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षण संचालक श्री भगत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आल्याची अखिल गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा.दिलीप धारगळकर यांनी दिली.

तसेच कोविडग्रस्त झालेल्या शिक्षकांसाठी खास रजेची तरतूद करून तसे परिपत्रक काढल्याबद्दल संघटनेने शिक्षण मंत्री तथा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत  व शिक्षण संचालक श्री भगत यांचे आभार  व्यक्त केले आहेत.
या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना केवळ २५० प्रति तास मानधन दिले जाते हे  मानधन अत्यंत तुटपुंजे आहे घरातून शाळेत हजर राहण्यासाठी होणारा वाहतूक खर्च,शिक्षक म्हणून समाजात  वावरताना त्याला कपडे आदी गोष्टीवर होणारा खर्च तसेच अन्य खर्च पाहता तसेच त्याची शैक्षणिक पात्रता पाहता २५० रू.म्हणजे थट्टा केल्यासारखे वाटते तरी शिक्षण खात्याने या सर्व बाबींचा विचार करून मानधनात त्वरित वाढ करून अश्या शिक्षकांना दिलासा द्यावा. कंत्राटी पद्धतीवर गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या शिक्षकाचा सेवा काल लक्षात घेवून त्यांना सेवेत कायम करणे.

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात ( सप्टेंबर अखेर) सेवा निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना त्या  शैक्षणिक वर्षा अखेर पर्यंत सेवेत कायम ठेवणे तसे न झाल्यास शैक्षणिक वर्षाच्या एकदोन महिन्यात एखादा शिक्षक निवृत्त झाल्यास नवीन शिक्षक सेवेत रुजू होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते नवीन शिक्षकांशी जुळवून घेताना विद्यार्थ्यांना बरेच त्रास होतात या बाबी लक्षात घेवून   शैक्षणिक सत्राच्या पहिल्या सत्रात निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेर पर्यंत सेवेत कायम ठेवावे त्याला एस्टेंशन द्यावे.तसेच शिक्षक संघटनेची नोंदणी  फी अनुदान साठी ग्राह्य धरावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: