सातारा 

तेजस शिंदे धावले जावलीच्या मदतीला

​​मेढा ​(प्रतिनिधी) :
दुर्गम कडेकपारीत दुर्गम जीवन जगणारी कष्टकरी जावलीच्या जनतेवर अतिवृष्टीने आसमानी संकट को​सळले आहे. कष्टकरी जनतेच्या मुखातील घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला आहे. पोटासाठी कष्ट​ ​करणाऱ्या जावलीतील रेगडीच्या शेतकर्याना ओढा ओलांडताना पाण्यात वाहुन जाऊन जीव गमवावा लागला आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ​यांच्या माध्यमा​तून पश्चिम महाराष्ट्राला भरभरून मदत दिली आहे . जावलीचा सुपुत्र म्हणुन माझ कर्तव्य म्हणुन शेतकरी अन् कष्टकरी जनतेची मदत नव्हे तर कर्तव्य म्हणुन मी आज तुमच्या भेटीला आलो असल्याचे भावनिक अवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष तेजस शिंदे यांनी जावली येथील भेटी दरम्यान केले .

राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष तेजस शिंदे यांनी जावलीत ​पावसाची संततधार सुरु असताना देखील​ ​पायी चालत मुकवली, भुतेघर, आंबेघर​, ​वाहीटे या गावातील शेतात जाऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची व नुकसानीची ​पाहणी केली. जावली तालुक्यातील जनता पा​वसाने भयभीत झाली आहे. जनता ​भीतीखाली असताना भुमीपुत्र ​म्हणून आपुलकीने विचारणा केली. जावली तालुका आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी ४० ​जीवनावश्यक कीट तहसिलदार जावली यांच्या सुपुर्त केले​. ​
जावलीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पुर्ण​ माहिती तहसि​​लदार जावली याच्याकडुन ​घेऊन ​राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यामातुन जावलीचा सुपुत्र म्हणुन जास्ती​त​जास्त मदत कष्टकरी जावलीच्या शेतकरी व नुकसानग्रस्ताना करणार असल्या​चे आश्वासन तेजस शिंदे यांनी दिले​. ​
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवकचे सरचिटणीस गोर​खनाथ नलावडे, बाजीराव धनावडे, बाबुराव शिर्के, शांताराम कासुरडे, दीपक मोरे ,सचिन बिरामने , जगन्नाथ पार्टे ,विठ्ठल पवार ,दीपक पवार,  संकेत पाटील,अतिष कदम, सुहास चव्हाण ,अनिकेत बेलोशे​, ​ राजू सुतार​, साहेबराव शेलार  कार्यकर्ते जावली​तून उपस्थित होते​. ​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: