महाराष्ट्र

​’​म्युकरमायकोसिस​’​मुळे वाढले पुणेकरांचे टेंशन…

​पुणे (अभयकुमार देशमुख) :
कोरोनाला सुरुवात झाली तेव्हा कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुणेकर भयभीत झाले होते. अद्यापही कोरोनाचे संकट पुर्णता दुर झालेले नाही. काही अंशी कोरोना रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागल्याचे दिलासादायक चित्र पुण्यात दिसू लागले आहे. मात्र सद्यस्थितीत कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असतानाच पुणेकरांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. आणि ते संकट आहे. म्युकरमायकोसिसचे.​ ​(mucormycosis) पुणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसमुळे 20 जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोबतच पुण्यात सर्वाधिक म्युकरमायकोसिसचे रुग्ण असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. सक्रिय बाधितांचीही संख्या कमी होताना दिसत आहे. असे असताना मात्र म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) रुग्नांची संख्या पुणे जिल्ह्यात वाढताना दिसत आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 318 जणांना म्युकर मायकोसिसची बाधा झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडं करण्यात आली आहे.  तर आज अखेर 20 जणांचा बळी म्युकर मायकोसिसनं घेतल्याचे समोर आले आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये आजअखेर कोरोनाची रुग्णसंख्या 9 लाख 62 हजारांवर गेली आहे. तसेच सद्या उपचार घेत असलेली अँक्टीव्ह रुग्णसंख्या ही 48 हजारांहून अधिक आहे. त्या तुलनेत म्युकर मायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीसुध्दा हा आकडा 318 एवढा आहे. आणि ही संख्या महराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सर्वात जास्त आहे.

एकूणच पुणेकरांना आता कोरोना आणि म्युकरमायकोसिस अशा दुहेरी संकटाना तोंड द्यावे लागणार आहे.​​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: