कला-साहित्यगोवा 

द अ‍ॅक्सिडेंटल जर्नालिस्ट’चे उद्या प्रकाशन

पणजीः
ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू लिखित आणि सहित प्रकाशनच्यावतीने प्रकाशित ‘द अ‍ॅक्सिडेंटल जर्नालिस्ट’ या पत्रकारिता आत्मवृत्ताचं प्रकाशन 27 जुलै रोजी होत आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन संध्याकाळी 4 वा. कला आणि संस्कृती भवनाच्या मुख्य सभागृहामध्ये होणार आहे. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि मल्लिकार्जुन हायर सेकंडरी स्कूलचे प्राचार्य मनोज कामत यांची उपस्थिती असणार आहे.

गोव्यातील पहिल्या टीव्ही चॅनेलचे संस्थापक-संपादक असलेल्या वामन प्रभू यांनी आपल्या 50 वर्षांच्या पत्रकारितेचा आढावा आणि आठवणींचा वेध ‘द अ‍ॅक्सिडेंटल जर्नालिस्ट’ या आत्मवृत्तपर पुस्तकामध्ये घेतला आहे. या 50 वर्षांमध्ये गोव्याच्या पत्रकारितेमध्ये कशाप्रकारे बदल घडत गेले, याचं चित्रण या पुस्तकामध्ये करण्यात आलं आहे. 1 ऑगस्ट रोजीच्या पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचं प्रकाशन 27 जुलै रोजी होत असून, सदर कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते निर्बंध पाळून फक्त निमंत्रितांसाठीच असल्याचं सहित प्रकाशनचे व्यवस्थापकीय संपादक किशोर अर्जुन यांनी सांगितलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार संपादक आणि प्रसिद्ध लेखक अरविंद व्यं. गोखले यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहीली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: