सातारा 

‘कृष्णे’ची अर्ज छाननी सुरु…

कराड (अभयकुमार देशमुख) :
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक 2021- 25 च्या निवडणुकीच्या अर्जांची छाननी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आली. यावेळी तिन्ही पॅनेलच्या नेत्यांसह त्यांच्या समर्थकांनी बाजार समितीच्या आवारात गर्दी केली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त बाजार समितीच्या आवारात दिसून येत होता.

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सभासदांचे लक्ष ही निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार याकडे लागले आहे. काही दिवसात याचे चित्र स्पष्ट होणार असले तरी कृष्णाकाठी निवडणुकीचा माहोल तयार होण्यास सुरुवात झाली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: