गोवा 

कासार्वरणेचा कालवा फुटला; दुचाकींची झाली गैरसोय

पेडणे (प्रतिनिधी) :
कासार्वरणे पेडणे येथील तिळारी कालवा फुटल्याने मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी , या रस्त्यावरून वाहने काढताना बरीच धांदल उडाली , दुचाकी वाहने घेवून जाताना बऱ्याच अडचणी येत होत्या अशी माहिती स्थानिक युवक साहिल नारूलकर यांनी दिली  .हा कालवा रस्त्याच्या वरच्या बाजूला आहे , त्याची वेळेवर दुरुस्ती केली नसल्याने त्याला भगदाड पडले आणि या कालव्यातून येणारे पाणी डोंगर भागातून काजू बागायातीतून मिळेल तिथून वाट काढत सकाळी ९ पर्यंत पाणी यायला मुख्य रस्त्यावर सुरु झाले हळू हळू पाणी सकाळी ११ नंतर मोठ्या प्रमाणात वाढले , त्यात दुचाकी वाहनांना रस्त्यावरून वाहनाना मार्ग काढणे कठीण झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावरून जाणारे वाहनचालक नागरिक भयभीत झाले  होते .

या विषयी कासार्वरणे सरपंच पांडुरंग पार्सेकर यांच्याकडे संपर्क साधला असता . पूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे , वाहने चालवणे कठीण बनले आहे . स्थानिक पंचायत तलाठी समीर धुरी यानाही कळवून त्यांनी  मामलेदार याना कळवल्याचे सांगितले .


पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांच्याकडे संपर्क साधला असता . आपण या घटनेची त्वरित माहिती पेडणेचे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांच्याकडे संपर्क साधला  दिली , असे सांगून आपणास उपजिल्हाधिकारी श्री . निपाणीकर यांनी आपण त्वरित मामलेदार अनंत मळीक व जलसिंचन विभागाला रस्त्यावर जी चिखलमय माती आहे ती काढायला लावल्याचे सांगितले  .

कासार्वरणे रस्त्यावर अचानक डोंगर माळरानातून चिखलमय पाणी आल्याने लोक भयभीत झाले , काही स्थानिकांनी आपले आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे संपर्क साधून माहिती दिली . उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी तातडीने आपत्कालीन सेवेकडे संपर्क करून तातडीने मदत कार्य सुरु करायची सुचना केली .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: