गोवा 

​​‘जीएमसी’तील ‘ऑक्सिजन’ प्रकरणाची होणार चौकशी

पणजीः

पहाटे २ ते ६ या काळात ऑक्सिजन अभावी  कोविड रुग्णांचे झालेले मृत्यू आणि त्यानंतर ​विरोधी पक्ष आणि उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने ​सरकारला जाब विचारल्यानंतर सरकारने आता या सगळ्या घटनाक्रमाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. महसूल सचिव संजय कुमार यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला​. 
गोवा आयआयटीचे संचालक डॉ. बी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीवर जीएमसीचे माजी डीन डॉ. व्ही.एन.जिंदाल आणि डॉ. तारीक थॉमस यांचा समावेश आहे. या समितीला तीन दिवसांत आपला अहवाल देण्यास सांगितले आहे. विशेष करून या समितीने जीएमसीत मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो की नाही, याची चौकशी करायची आहे. या व्यतिरीक्त ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि अखंडीतपणे होतो का, याचीही खातरजमा करायची आहे. प्रत्यक्ष ऑक्सिजनचं व्यवस्थापन जीएमसीत कसं होतं आणि त्या अनुषंगाने अभ्यासाअंती काही शिफारसी असल्यास त्या समितीने कराव्यात,असे या आदेशात म्हटले आहे.​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: