सातारा 

राज्यमंत्री यड्रावकरांच्या माणुसकीने गहिवरले खंडाळावासीय 

सातारा (महेश पवार) :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर दिवसेंदिवस भीषण होत आहे. दररोज लाखो लोकांना या कोरोना विषाणूची लागण होत आहे . या कोरोना बाधितांवर उपचार वेळेत न मिळाल्याने अनेकजण दररोज मृत्युमुखी पडत आहेत .अशावेळी आक्रमक, करारी व धाडसी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले कार्यतत्पर व कर्तव्यपरायण आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी फक्त एका फोनवर कोरोनाबाधित खंडाळ्यातील एका कुटुंबास तत्काळ मदतीचा हात दिला. कोणतीही ओळख नसताना मिळालेल्या तत्काळ मदतीने बाधित कुटुंबाने माणुसकी अजूनही जिवंत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

​१​​ मे  रोजी तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील एक युवक खंडाळा औद्योगिक वसाहतीत कामाला जात असल्याने कोरोनाबाधित झाला होता . त्याचेवर जगताप हॉस्पिटल कोरोना केअर सेंटर शिरवळ येथे उपचार चालू आहेत . तो दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सर्वांना कोरोनाचा त्रास होत लक्षणे जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी सर्वांची टेस्ट करण्यासाठी प्रयत्न चालू केले​. परंतु सातारा जिल्हा लॉकडाऊन असल्याने सार्वजनिक अथवा खाजगी वाहन मिळत नव्हते. त्यामुळे टेस्ट करायला कसे जायचे ? या चिंतेमध्ये व  कोरोनाबाधित असल्याने होणाऱ्या त्रासाने कुटुंब हवालदिल झाले होते . अशावेळी त्यांनी तोंडल येथील राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद प्रदेश उपाध्यक्ष तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष वाई विधानसभा समन्वयक गणेश जाधव यांच्याशी संपर्क साधला. संबंधितांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल नसलेले स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांनी ॲम्बुलन्स अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन देण्यास असमर्थता दाखवली​. ​तसेच १०८ ऍम्ब्युलन्स कॉल सेंटरवर कॉल केला असता याच कारणाने सेवा नाकारण्यात आली​. ​

संबंधित कुटुंबाचे कोरोना टेस्ट होऊन तत्काळ उपचार मिळणे गरजेचे आहे ही बाब गणेश जाधव यांनी मोबाईलवर फोन करून आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांचे कानावर घालताच  त्यांनी तत्काळ दखल घेत स्वतः फोन करून केवळ वीस मिनिटात शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सरोदे यांना आदेश देत आरोग्य विभागाचे पथक सर्व  सामग्रीसह भर पावसात संबंधित कुटुंबाचे कोरोना टेस्ट करण्यासाठी तोंडल येथे पाठवले. तसेच टेस्टमध्ये पॉझिटिव आलेल्या कुटुंबातील तिघांना तत्काळ जगताप हॉस्पिटल केअर सेंटर शिरवळमध्ये दाखल करून उपचार चालू केले. राज्यमंत्र्यांच्या या तत्काळ मदतीने बाधित कुटुंबच नव्हे तर समस्त खंडाळकर आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे कौतुक करीत आहेत. तसेच सर्वचजण मनोमन असा संवेदनशील व कार्यतत्पर आरोग्यमंत्री दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे आभार मानत आहेत.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: