क्रीडा-अर्थमत

…म्हणून झाले कच्च्या तेलाचे दर कमी

मुंबई :
अमेरिकेच्या इंधन साठ्यात वाढ झाल्याने तेलाचे दर कमी झाले. बुधवारच्या सत्रामध्ये डबल्यूटीआय क्रूड ०.१ टक्क्याच्या किरकोळ घसरणीसह ७० डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. अमेरिकेच्या गॅस कंपन्यांच्या साठ्यामध्ये झालेल्या वाढीनंतर तसंच अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांकडून मागणी वाढल्यानंतर आणि अमेरिकेतील ऑईल इनव्हेंटरीजमध्ये घसरणीनंतरही कच्च्या तेलाचे दर कमी झालेले पाहायला मिळाले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या रिपोर्टनुसार, यूएस फ्युएल इनव्हेंटरीच्या साठ्यात गेल्या आठवड्यामध्ये ७ दशलक्ष बॅरलची वाढ झाली आहे. तर डिस्टिलेटच्या साठ्यामध्ये ४.४ दशलक्ष बॅरलची वाढ झाली आहे. अमेरिकेच्या तेलाच्या साठ्यातील या वाढीमुळं मागणीत सुधारणा आणि किंमतीबाबतचं वातावरण धूसर राहिलं.

अमेरिकेच्या साठ्यामध्ये गेल्या आठवड्यात ५.२ दशलक्ष बॅरलची घट ढाल्यानं तेलाच्या किमतींची घसरण मर्यादीत होती. गेल्या आठवड्यातील घसरण ही सलग ११ व्या आठवड्याची घसरण ठरली. ३.३ दशलक्ष बॅरलची घट होण्याचा अंदाज ओलांडत हा आकडा वाढला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी तेहराणवरील बंदी उठवण्याची शक्यता नसल्याचे संकेत दिल्यानंतर जागतिक बाजारपेठेत इराणचे कच्चे तेल परत येण्याची शक्यता मंदावली आहे त्यामुळं कच्च्या तेलामुळं होणारं नुकसान वाढलं आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: