गोवा 

परदेशी पर्यटकांची परिस्थिती झाली गंभीर

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :

कोरोना काळात अडकून पडलेल्या विदेशी पर्यटकांची स्थिती सध्या गंभीर बनली आहे . व्हिसा संपूनही ते अडकून आहेत , दैनदिन पोटासाठी मिळवताना त्याना खूप अडचणी येतात. काही पर्यटक तर रस्त्याच्या बाजूला थांबूनही भिक मागत असतात , तोंडावर मास्क नाही , काही पर्यटक जखमी झाले आहेत त्याना दवाखान्यात जायलाही पैसे नाहीत . काम करणार तर कामही नाही , काही पर्यटक पर्यटक म्हणून येतात आणि कामाला लागतात व्यवसाय करतात . हे चित्र हरमल मांद्रे किनारी भागात भेट दिली तर चित्र पहावयास मिळते .

या विदेशी पर्यटकांना आपल्या गावात परत पाठवण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी हरमल येतील पंच सदस्य प्रवीण वायगणकर यांनी केली आहे. पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्वे- मांद्रे, हरमल , केरी या किनारी भागात अजूनही किमान १०० विदेशी पर्यटक आजही किनारी भागात अडकून पडलेले आहेत .

काही अडकलेले पर्यटक विविध हॉटेल शेक वर काम करत होते ,सध्या सर्व व्यवहार बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे ,सध्या हे तीन चार पर्यटक एकत्रित येऊन एका ठिकाणी बसतात दारू ढोसतात ,काही पर्यटका कोणत्यातरी कारणामुळे जखमी झाले आहे ,ते पायात चपला नसताना जातात ,त्यांना पाहून स्थानिकांची अचंबित होतात .कुणाकडून जेवण मागून ते जेवतात ,स्थानिक पंच प्रवीण यांच्याकडे संपर्क साधला असता  काही पर्यटक आपल्या देशात जायला तयार आहेत मात्र त्यांच्याकडे पैसे नाही व्हिसा नाही ,त्यांची सरकारने सोय करावी अशी मागणी वायगणकार यांनी केली .

कोरोनाने सर्वावर संकट आणले आहे , काही केल्या तो जाण्याचे नाव घेत नाही . कोरोनाचे नियम स्थानिक नागरिक पाळतात मात्र जास्त काळ कोरोनामुळे अडकून पडलेले विदेशी पर्यटक मात्र बिनदास्त तोंडावर मास्क न घालता फिरतात , त्यांच्याकडील पैसेही संपल्याने लोकांकडून दुकानदारांकडून उधारीवर सामान घेवून ते जीवन कंठीत असतात , ते मास्काचा वापर न करत असल्याने कोरोना फैलावण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहे .

हरमलचे सामाजिक कार्यकर्त्ये तथा पंच सदस्य प्रवीण वायगणकर यांनी प्रतिक्रिया देताना हरमल व इतर ठिकाणी काही विदेशी पर्यटक किनाऱ्यावर मास्क न घालता फिरतात , काही व्हिसा संपूनही कोरोनामुळे अडकून पडले आहेत , त्याची सरकारने सोय करावी अशी मागणी पंच प्रवीण यांनी केली आहे .

हरमल , मोरजी , मांद्रे , केरी या किनारी भागात सध्या विदेशी पर्यटक वास्तव्य करून आहेत काही पर्यटक व्हिसा नसताना राहतात , त्याची सरकारने चौकशी करायला हवी . काही पर्यटक मास्क शिवाय किनाऱ्यावर , दुकानावर , बाजारात फिरतात , त्यांच्यावर कोणी कारवाई करत नाही, मात्र पोलीस स्थानिक कुणी मास्क घातले नाही तर लगेच २०० रुपये दंड घेवून कारवाई करतात .

कोरोना महामारीच्या काळात गेल्या पर्यटन  हंगामात अनेक विदेशी पर्यटक अडकून पडले होते त्याना काही स्थानिक नागरिकांनी किंवा ज्यांच्या घरात भाडेकरू म्हणून पर्यटक अडकून पडले त्याना घरमालकांनी मोफत जेवण तयार करून दिले घराचे भाडे माफ केले होते .

लॉकडाऊनमुळे अनेक विदेशी पर्यटक अडकून पडले आह, पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशविदेशातून आलेले पर्यटक लॉक डाऊनमुळे अडकून पडले , काही पर्यटक केरी किनारीही वास्थव्य करून होते, काही पर्यटक खाजगी घरात अडकून राहिले  असून हॉटेल्स बंद असल्याने त्याना जेवणही मिळत नाही.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: