नाशिक

…तर ‘नाशिक’च्या ‘त्या’ रुग्णालयांवर होणार कारवाई

नाशिक ​(अभयकुमार देशमुख​) :
 नाशिक हॉस्पीटल ओनर्स असोशिएशन आणि इतर वैद्यकीय संघटनांनी नाशिकमधील खाजगी रुग्णालये कोरोनाचे रुग्ण दाखल करुन घेणार नाहीत. असे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले होते.

​दरम्यान, नाशिक हॉस्पीटल ओनर्स असोशिएशन आणि इतर वैद्यकीय संघटनांच्या या भूमिकेवर पालिका आयुक्त कैलास जाधव आणि जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. जर कोरोना रुग्णांना नाकाराल तर कारवाई करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
​पत्राव्दारे असोसिएशनने आजपासून कोरोना रुग्न खाजगी रुग्णालयात दाखल केले जाणार नाहीत. असे सांगितले होते. मागील दिड वर्ष सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीत दिवसरात्र काम केले असून आता मानसिक आणि शारीरिक थकवा जानवत असल्याने कोरोना रुग्ण दाखल करुन घेणार नसल्याचे नमूद केले होते.
Share

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: