गोवा देश-विदेश

‘…तर आतापर्यंत कोविड गायब झाला असता’

जोसेफ डायस यांचे आप-भाजपवर शरसंधान

मडगाव :
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आताचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केलेल्या महत्वपूर्ण सुचनांकडे आप आणि भाजप परिवाराने दुर्लक्ष केल्यानेच आज लोक कोविड महामारीच्या जबड्यात ढकलेले गेले आहेत. जर भाजप व आम आदमी पक्षाच्या सरकारांनी मार्च २०२० मध्ये कामत यांनी केलेल्या सुचनांची नोंद घेतली असती तर आतापर्यंत कदाचित देशातून कोविड गायब झाला असता असे विधान दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.आज आप सरकारचे दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी लष्कराची मदत मागीतली, त्या पार्श्वभूमीवर जोसेफ डायस यांनी आम आदमी पक्ष व भाजपवर शरसंधान साधले.
कोरोनाचा संसर्ग नुकताच पाय पसरवित होता त्यावेळी संभाव्य धोका लक्षात घेवून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात समाजातील तज्ञ व लष्कराचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेले कृती दल स्थापन करण्याची विनंती केली होती. परंतु, भाजप व आप सरकारने या सुचनेकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. आज देशातील भाजप व दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार लोकांना जगण्याचा मुलभूत अधिकार देण्यासही अपयशी ठरले आहे. जेव्हा प्रशासन कोलमडले तेव्हाच न्यायपालिकेला दखल द्यावी लागते असे आपचे गोवा निमंत्रक राहुल म्हांब्रे यांनी दिल्लीतील ऑक्सिजनच्या तुटवड्याला केंद्र सरकारला जबाबदार धरण्याच्या केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना जोसेफ डायस यांनी म्हटले आहे.
कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर मागील एक वर्ष भाजप व आप जाहिरातबाजी करण्यात व उत्सव साजरे करण्यात व्यस्त होते. त्यामुळेच आरोग्यसेवेसाठी आवश्यक साधन-सुविधा निर्माण करण्यास त्यांना अपयश आले व त्याचे परिणाम लोकांना भोगावे लागत आहेत असा आरोप जोसेफ डायस यांनी केला.
covidखासगी इस्पितळांना लसी कशा मिळाल्या?  
आज गोवा सरकारने एका खासगी इस्पितळाला भरमसाठ शुल्क आकारुन लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. राज्यात लसींचा तुटवडा असताना खासगी इस्पितळांना लसी कशा मिळाल्या यावर भाजप व आप गप्प आहेत. दोन्ही पक्ष भांडवलशाही धोरण पुढे राबवित असुन, सामान्य लोकांचे त्यांना काहिच पडलेले नाही. आता केंद्रातील भाजप व दिल्लीतील आप सरकार कॉंग्रेस पक्षाच्या सुचनांची दखल घेवून कोविड हाताळणीसाठी उपाययोजना करित आहेत ही चांगली गोष्ट आहे. कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज तळागाळात लोकांना मदत करीत असुन, कोविड संकटात जनतेला दिलासा देण्याचे काम करीत आहेत त्याची दखल भाजप व आपच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी याकडे जोसेफ डायस यांनी लक्ष वेधले.
Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!