गोवा 

होड्यांचे मोटर चोरल्याप्रकरणी एकाला अटक

पेडणे (प्रतिनिधी) :
येथील पोलिसांनी किनारी भागातील मच्छिमार होड्यांच्या मोटर चोरी प्रकरणी चोडण तिसवाडी येथील संदेश चोडणकर याला १३ रोजी अटक केली व ३ लाख आठ हजार किमतीचे मोटार इंजिन जप्त केली.

पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहिती नुसार १० रोजी केरी धाकटेबाग येथील रोहन पेडणेकर यांनी आपल्या होडीचा मोटार चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस टीम तयार केली व काही ठिकाणी सीसीटीव्ही चित्रीकरण घेतले. त्यात संशयीची ओळख पटली. पोलिसांनी जाळे टाकून त्याला शिताफीने पकडले व त्याच्या घरातून दुसऱ्या एका मोटारचे इंजिन जप्त  केले.

दरम्यान मागच्या दीड वर्षापासून मोरजी, मांद्रे हरमल व केरी या ठिकाणचे मच्छीमार बांधव व्यावसायिकांचे किमान १० ते १२ मोटार चोरीला गेले आहे. त्याविषयी तक्रारीही दिल्या मात्र आजपर्यत त्या मोटारींचा पत्ता लागला नाही, त्यामुळे व्यावसायिक नाराजी व्यक्त करत होते .

दरम्यान, पेडणे पोलिसांनी संदेश चोडणकर या चोरट्याला अटक केली आहे. इतर १० /१२  चोरीला गेलेल्या मोटारांचा तपास लावावा अशी मागणी होत आहे ,

पकडलेल्या चोरी प्रकरणी पोलीस निरीक्षक जिवबा दळवी हे पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई व अधीक्षक सोबीत सक्षेना यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: