सातारा 

नदीपात्रात सापडले तीन जिवंत बॉम्ब

सातारा (महेश पवार) :
कराड तालुक्यातील तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये तीन जिवंत ग्रॅनाईट (बॉम्ब) सापडले. पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे.  सोमवार दि. १७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही बाब समोर आली.

कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच असलेल्या तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये सोमवारी सकाळी काही युवक मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासे पकडण्यासाठी त्या युवकांनी नदीच्या पाण्यामध्ये जाळी टाकल्यानंतर त्यांच्या गळाला मासा लागला असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी तो गळ नदीच्या पात्रातून पाण्याबाहेर काढला. त्यावेळी त्यामध्ये ग्रॅनाईट (बॉम्ब) असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  मासेमारी करणाऱ्या युवकांनी याबाबत त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, सापडलेले ग्रॅनाईट सैन्य दलाचे असावेत असा अंदाज आहे. घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथकाने भेट दिली असून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

सातारा bomb

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: