गोवा 

 चांदेल येथे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ कार्यक्रम

पेडणे ​(प्रतिनिधी) :​
जागतिक पर्यावरण दिनचे औचित्य साधून पेडणे भाजप मंडळ, तथा चांदेल हसापूर पंचायत चे पंच, समाजसेवक तुळशीदास गावस यांच्या अध्यक्षतेखाली चांदेल येथे झाडे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना तुळशीदास गावस यांनी सांगितले की, पर्यावरणाचा समतोल सांभाळला असेल तर जास्तीस जास्त झाडे लावली पाहिजे, ती वाढवली पाहिजे, व सौरक्षण केले पाहिजे. आज विकासाची गंगा आणत असताना हजारोंच्या संख्येने झाडे कापली जातात त्या जागी नवीन झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने किमान एकतरी झाड लावले पाहिजे.

यावेळी संदेश गावस, अरुण गावस, सुवेक गवस, स्वपनील भाईप, सुशांत गवस, शशिकांत गवस, चिन्मय गवस, निखिल शेटकर, सौरभ गवस, किरण गवस, परेश गवस, नितेश गवस, साईस शेटकर, सागर गवस, सुनील गवस, गैरेश गवस, भाऊ गवस आदी उपस्थित होते.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: