क्रीडा-अर्थमत

‘ट्रूक’ने लाँच केले एअरबड्स लाइट व बीटीजी 3

मुंबई :
ट्रूक या भारतातील उत्तम दर्जाचे वायरलेस स्टिरिओ, वायरलेस हेडफोन्स, साऊंड प्रोफेशनल्ससाठी तसेच संगीत चाहत्यांसाठी इयरफोन्स आणि बीस्पोक ऑकोस्टिक उपकरणे बनवणा-या आघाडीच्या ऑडिओ ब्रॅण्डने दोन आकर्षक उत्पादने एअरबड्स लाइट व बीटीजी३ लाँच केले आहेत. या उत्पादनांमध्ये समान वैशिष्ट्ये असण्यासोबत त्यांच्या डिझाइन्स वेगवेगळ्या आहेत, ज्यामुळे दोन विभिन्न ग्राहक विभागांच्या गरजांची पूर्तता होते. बीटीजी३ अॅमेझॉन व फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल, तर एअरबड्स लाइट फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. या दोन्‍ही उत्पादनांची किंमत १.३९९ रूपये आहे.

एअरबड्स लाइट व बीटीजी३ विशेषीकृत गेमिंग मोड व ५५ एमएसपर्यंत अल्ट्रा-लो लेटन्सीसह दर्जात्मक गेमिंग अनुभव देतात. दोन्‍ही उत्पादनांमध्ये एम्पिरिकल टेक्नोलॉजीची शक्‍ती आहे, जे दुप्पट ऊर्जा कार्यक्षमता, दुप्पट ट्रान्समिशन स्पीड आणि १.८ पट विश्वसनीय कनेक्शनची खात्री देते. तसेच या उत्पादनांमध्ये एआय-सक्षम डीप न्यूट्रल नेटवर्क कॉल नॉईज कॅन्सलेशन तंत्रज्ञान आहे, जे गोंगाट असलेल्या ठिकाणी देखील कॉलिंग दर्जा वाढवते. ब्ल्यूटूथ ५.१ सह सुसज्ज ऑटो प्ले/पॉज म्युझिक वैशिष्ट्य युजर्सना हाय-प्रीसिशन कॉन्टॅक्ट सेन्सरचा वापर करण्याची सुविधा देते, जे डिवाईसच्या वीअरिंग स्टेटसचे निदान करते आणि कानांमध्ये बड्स टाकताच आपोआप म्युझिक सुरू करते. ग्राहकाच्या आवडीनुसार डाव्‍या बाजूच्या इअरबडवर ३ वेळा टॅप करत इन-इअर डिटेक्शन ऑन/ऑफ करता येऊ शकते.

ट्रूक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज उपाध्याय म्हणाले, “२०२१ आमच्यासाठी यशस्वी वर्ष ठरले, जेथे आम्‍ही वर्षभर विविध उत्पादने लाँच केली. या उत्पादनांना भागधारक व ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्यासोबत आम्हाला टीडब्ल्यूएस विभागामध्ये लक्षणीय बाजारपेठ हिस्सा संपादित करण्यामध्ये देखील मदत झाली. आम्हाला या लाँचसह २०२२ ची दिमाखात सुरूवात करण्याचा आनंद होत आहे. आम्ही आमची नवीन टीडब्ल्यूएस सिरीज एअरबड्स सादर करण्यासोबत आमची गेमिंग-केंद्रित ‘बॉर्न टू गेम (बीटीजी)’ सिरीजमधील पुढील उत्पादन लाँच करत आहोत. आम्हाला विश्‍वास आहे की, आमच्या ग्राहकांना किफायतशीर दरामधील उच्चस्तरीय वैशिष्ट्यांनी युक्त ही दोन्ही उत्पादने आवडतील.”

Truke-Airbuds-Lite

बीटीजी३ मध्ये सानुकूल गेम कोअर चिपसेटसह उच्च कार्यक्षमता व सुधारित साऊंड क्वॉलिटी आहे. कॉम्पॅक्ट केस डिझाइनसह एर्गोनॉमिक इन-इअर इअरबड्स ४८ तासांचे प्लेटाइम, एका चार्जमध्ये १० तासांचे प्लेटाइम आणि ३०० एमएएच चार्जिंग केससह अतिरिक्त ३८ तासांचे प्लेटाइम देतात. तसेच इअरबड्समध्ये अद्वितीय सिनेमॅटिंग साऊंड एक्स्पेरिअन्ससह १० मिमी ३२ ओहम टायटॅनियम ड्रायव्हर्स आहेत, जे हाय डायनॅमिक्स, हाय सेन्सिटीव्हीटी व हाय फिडेलिटी देतात. तसेच सर्वोत्तम आधुनिक तंत्रज्ञानासह एचडी क्वॉलिटी कॉलिंग गोंगाट असताना देखील सुस्पष्टपणे ऐकू येण्याची खात्री देते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: